Today Horoscope: सूर्याचं होणार नक्षत्र परिवर्तन! सोन्यासारखं चमकेल 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Today 10 September Horoscope
Today 10 September Horoscope
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळं कोणत्या राशींना मिळणार लाभ?

point

या राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील

point

कोणत्या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ?

Today 10 September 2024 Horoscope : सूर्यदेव 30 सप्टेंबरला पुर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी शुक्र आहेत. तेही यावेळी याच नक्षत्रात बसले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन चार राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

मेष राशी 

कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना एक चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. वेतनात वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापार वाढवण्याबाबत विचार करू शकता. नवीन काम सुरु करण्यासाठी योग्य वेळ आहे. गुंतवणूक करण्यासाठीही वेळ अनुकूल आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांची पैशांची कमतरता दूर होईल. समाजात मान सन्मान वाढेल. तुमच्या वाणीत सुधारणा होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. 

ADVERTISEMENT

कन्या राशी

ADVERTISEMENT

तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टींमुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. विजय झाल्याचा जल्लोष कराल. नोकरी करणाऱ्यांना पैसा, मान सन्मान, सुख-संपत्तीची प्राप्ती होईल. तुम्ही वाहन आणि संपत्ती खरेदी करू शकता. तुम्हाला सरकारी संस्थेकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. 

हे ही वाचा >> Lokpoll Survey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा सर्व्हे आला समोर! MVA उडवणार महायुती सरकारची झोप

तुळा राशी 

गुंतवणुकीसाठी नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. व्यापारांसाठीही यशस्वी होण्याचे योग आहेत. तुम्हाला तुमच्या व्यापारात नफा होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी

जीवन आनंददायी असेल. आरोग्य चांगलं राहील. व्यापार खूपचं चांगलं राहील. हनुमानाची भक्ती करत राहा.

मिथुन राशी

शत्रुंसोबत सामना झाल्यास तुमचा विजय होईल. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार चांगलं राहील.

कर्क राशी

भावनांवर नियंत्रण ठेवा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधापासून थोडसं सावध राहा. मुलांची स्थिती चांगली असेल. 

वृश्चिक राशी

जीवनात शक्ताशीली राहाल. आवश्यकतेनुसार गोष्टी मिळत राहतील. आरोग्य चांगलं राहील. व्यापार उत्तम राहील. 

हे ही वाचा >> Jalna Crime: धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या! 'त्या' ढाब्यावर नेमकं काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT