Vastu Tips: चुकूनही बेडरूममध्ये 'या' गोष्टी ठेवू नका, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होईल..
Bedroom Vastu Tips: जर घरातील बेडरूममध्येच नकारात्मकता असेल तर कोणीही आनंदी राहणार नाही. जाणून घ्या बेडरूमच्या वास्तू टिप्सबाबत.
ADVERTISEMENT

चुकूनही बेडरूममध्ये 'या' गोष्टी ठेवू नका
▌
बातम्या हायलाइट
बेडरूमसाठी काय आहेत वास्तू टिप्स
बेडरूमच्या भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावू नका
बेडरुममध्ये राधा-कृष्णाच्या मूर्तीचे चित्र वैवाहिक जीवन सुधारते
Vastu Tips: घरातील बेडरूममध्ये वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे वैवाहिक जीवनात संघर्ष, आर्थिक संकट आणि विशेषतः आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते.
घराचा प्रमुख ज्या मास्टर बेडरूममध्ये झोपतो तो नैऋत्य कोपऱ्यात असावा. वास्तुशास्त्रानुसार घराची बेडरूम कशी असावी ते जाणून घेऊया...
हे ही वाचा>> रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे करा ही खास एक्सरसाइज, अन् पाहा...
तुमच्या बेडरूममधून या गोष्टी ताबडतोब काढून टाका
1- बेडरूममध्ये चुकूनही आक्रमक प्राणी किंवा प्राण्यांचे फोटो किंवा रागावलेल्या देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती असू नयेत.
2- बेडरूममध्ये पूजेसाठी मंदिर किंवा पूजास्थळ बनवू नये.










