… तर, भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी होऊ शकतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष!

रोहिणी ठोंबरे

अमेरिकेत पुढील वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून अनेक चेहरे उमेदवारीसाठी रिंगणात आहेत. यापैकी एक भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आहेत. 38 वर्षीय कोट्यवधी रूपयांचे उद्योगपती विवेक आपल्या प्रचारात व्यस्त आहे. यादरम्यान, एलॉन मस्क यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

vivek ramaswamy in race of america presidentship candidates
vivek ramaswamy in race of america presidentship candidates
social share
google news

Vivek Ramaswamy : अमेरिकेत पुढील वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून अनेक चेहरे उमेदवारीसाठी रिंगणात आहेत. यापैकी एक भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आहेत. 38 वर्षीय कोट्यवधी रूपयांचे उद्योगपती विवेक आपल्या प्रचारात व्यस्त आहे. यादरम्यान, एलॉन मस्क यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. (Vivek Ramaswamy of Indian origin can become the President of the United States)

काही दिवसांपूर्वी विवेक रामास्वामींनी पत्रकार टकर कार्लसनला मुलाखत दिली होती. ट्विटरवर मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं की, ‘विवेक रामास्वामी एक आश्वासक उमेदवार आहे.’ मस्क यांच्या या ट्विटनंतर विवेक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मस्क यांनी केलेलं कौतुक विवेक रामास्वामींना खूप उपयोगी पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…

विवेक रामास्वामी कोण आहेत?

अमेरिकेत द्विपक्षीय व्यवस्था आहे. रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष. दर चार वर्षांनी या दोन पक्षांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक लढत असते. मात्र या दोन पक्षांतूनही अनेक उमेदवार डाव खेळतात. त्यांच्यातही स्पर्धा आणि प्रचार आहे. तेव्हा कुठे एखादा पक्ष, उमेदवार निश्चित करतो. 38 वर्षीय विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाचे सर्वात तरुण उमेदवार असून त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा चेहरा बनायचे आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रेटिंगच्या बाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांची नावं सर्वात आधी येतात. मात्र, गेल्या काही काळापासून विवेक रामास्वामींचा आलेख सुधारत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp