Ladka Bhau Yojana Documents : 'ही' पाच कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!

मुंबई तक

Ladka Bhau Yojana Documents in Marathi : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली आहे. या योजनेचा लाडका भाऊ योजनाही म्हणूनही उल्लेख केला जात आहे. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तेच जाणून घ्या...

ADVERTISEMENT

वाचा लाडका भाऊ योजनेबद्दल महत्त्वाची माहिती.
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडका भाऊ योजनेसाठी कुणाला अर्ज करता येणार?

point

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवी?

point

लाडका भाऊ योजनेतंर्गत कोणाला किती पैसे मिळणार?

Ladka Bhau Yojana Maharashtra in Marathi : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बरोबरच महाराष्ट्र सरकारने 'लाडका भाऊ योजना' अर्थात 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' लागू केली आहे. या योजनेतंर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून, या काळात विद्यावेतनही दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. (What documents are required for Ladka Bhau Yojana?)

पदवी, पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामांचा अनुभव मिळावा आणि त्या काळात त्यांना पैसे मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणूनही संबोधलं जात आहे. 

Ladka Bhau Yojana Information : कोणाला करता येणार अर्ज?

12वी उत्तीर्ण, आयआयटी प्रमाणपत्र धारक, पदविका धारक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार 18 ते 35 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे? 

Required Documents Ladka Bhau Yojana : 'ही' कागदपत्रे हवीच

- अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असावा.

हे वाचलं का?

    follow whatsapp