Nobel Prize च्या जन्माची गोष्ट, कशी झाली सुरूवात; कोण होते अल्फ्रेड नोबेल?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Alfred Nobel and History of Nobel Prize : 2023 साठी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा सुरू झाली आहे. वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. हंगेरीच्या कॅटलिन कारिको आणि अमेरिकेच्या ड्रू वाइजमॅन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळाले. दोघेही पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एकत्र काम करतात. मेसेंजर RNA (mRNA) तंत्रज्ञानाच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळेल. कोरोना लस तयार करण्यासाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. भौतिकशास्त्रात तीन शास्त्रज्ञांना पुरस्कार मिळाले आहेत. पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉस आणि अॅन लेहुलियर. (Who is Alfred Nobel Know the History of Nobel Prize Starting)

नोबेल पारितोषिक 06 कॅटेगरींमध्ये दिले जाते. रसायनशास्त्र, पीस, अर्थशास्त्र आणि साहित्यातील विजेत्यांची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल.

Hemant Patil : शिंदेंच्या खासदाराला स्टंटबाजी भोवली! पोलिसांनी दाखल केला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. त्याची स्वतःची ओळख आहे. तो प्रामाणिकपणा आणि मानवतेचा निकष मानला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्याकडून या पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झाली. त्यांचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झाला. जेव्हा ते 4 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब रशियाला स्थायिक झाले. त्यांचे वडील गनपावडरचा कारखाना चालवायचे. रशियाचा राजा देखील खरेदीदारांमध्ये होता. नंतर गनपावडरचा वापर कमी झाला. यामुळे अल्फ्रेडच्या वडिलांना कारखाना बंद करावा लागला. ते स्वीडनला परत आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पण अल्फ्रेड यांनी गनपावडर बनवणं सोडलं नव्हतं. त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मग ते स्वस्त आणि सुरक्षित प्रकारची स्फोटके बनवू लागले. संशोधनादरम्यान प्रयोगशाळेत एक अपघातही झाला. यामध्ये त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. मात्र, नंतर डायनामाइट बनवण्यात त्यांना यश आले. डायनामाइटनंतर, अल्फ्रेड यांनी 1875 मध्ये जिलेटिनचा शोध लावला. त्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढत गेला. त्यांनी युरोपमधील स्वीडन, जर्मनी, स्कॉटलंड, फ्रान्स आणि इटलीमध्ये 90 हून अधिक कारखाने उभारले. स्वीडनच्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना होते.

त्यानंतर 1888 साली अल्फ्रेड यांचा एक भाऊ लुडविग मरण पावला. ही बातमी वर्तमानपत्रात आली. पण काही ठिकाणी लुडविगच्या ऐवजी अल्फ्रेडचे नाव छापण्यात आले. एका फ्रेंच वृत्तपत्राने लिहिलं की, “मृत्यूचा व्यापारी… अल्फ्रेड नोबेल, जे शक्य तितक्या लोकांना मारण्याचे नवीन आणि जलद मार्ग शोधून श्रीमंत झाले. काल रात्री त्याचा मृत्यू झाला.”

ADVERTISEMENT

India Today Conclave Mumbai 2023 : शिंदे, पवार, फडणवीसांसोबत राजकीय गप्पा, ‘या’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

बातमी वाचून अल्फ्रेड यांना धक्काच बसला. आपल्या मृत्यूनंतर आपण ‘मृत्यूचे व्यापारी’ म्हणून स्मरणात राहू, याचं त्यांना वाईट वाटलं. त्यानंतर अल्फ्रेड यांनी स्फोटकांऐवजी इतर गोष्टींवर संशोधन सुरू केले. 1896 मध्ये त्यांचे निधन झाले. तोपर्यंत त्यांच्या नावावर 355 पेटंट होती. त्यांच्याकडे अंदाजे 1700 कोटी रुपयांची संपत्ती होती आणि एक इच्छापत्र होते जे त्यांनी मृत्यूच्या एक वर्ष आधी लिहिलं होतं.

ADVERTISEMENT

मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?

बहुतेक मालमत्ता निधी स्थापन करण्यासाठी देण्यात आली. या निधीतून मिळणाऱ्या व्याजातून पाच पुरस्कार सुरू होणार होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांत. सहावी श्रेणी 1968 मध्ये जोडली गेली. ती अर्थशास्त्र होती. विजेत्यांची निवड करणार्‍या संस्थांची नावेही मृत्यूपत्रात नमूद करण्यात आली होती.

अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्यूपत्र उघडण्यात आले. भयंकर गोंधळ झाला. घरच्यांचा आधीच राग होता. ज्या ट्रस्टला जबाबदारी दिली होती. त्यांनीही हात वर केले. खूप प्रयत्नांनंतर 1901 मध्ये नोबेल पारितोषिक मिळू शकले.

अजित पवार गटाच्या भूमिकेनं भाजपचं वाढणार टेन्शन! शिंदे सरकार काय करणार?

नोबेल पारितोषिक कसे मिळवायचे?

सर्व प्रथम नामांकन अर्ज भरला जातो. कोणीही कोणत्याही व्यक्तीला नामनिर्देशित करू शकत नाही. फक्त शैक्षणिक, विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, भूतकाळातील नोबेल विजेते किंवा पारितोषिक प्रदान करणारी समिती ज्यांना योग्य मानते तेच व्यक्तीला नामनिर्देशित करू शकतात. ज्यांना नामनिर्देशित केले आहे, त्यांचे नाव 50 वर्ष पब्लिक करता येत नाही.

नामांकनानंतर समित्या (Committee) विचार करतात आणि, त्या अंतर्गत मतदानानंतर विजेता निवडला जातो. 1901 ते 2022 दरम्यान 615 नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत. काही बक्षिसे दोन किंवा तीन लोक किंवा संस्थांमध्ये विभागली जातात. आतापर्यंत 981 व्यक्ती आणि संस्थांना नोबेल मिळाले आहे. बक्षीस जास्तीत जास्त तीन व्यक्ती आणि संस्थांमध्ये विभागले जाऊ शकते. अशावेळी बक्षिसाची रक्कमही विभागली जाते.

विजेत्यांना काय मिळते?

एक प्रमाणपत्र, एक सुवर्णपदक आणि अंदाजे 08 कोटी रुपये दिले जातात. पण बक्षिसातल्या पैशांची किंमत दरवर्षी बदलत राहते. नोबेल पारितोषिक अतिशय पवित्र आणि सत्यनिष्ठेचे प्रतीक मानले जाते.

अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिलं आहे, ‘देशांमधील बंधुभाव वाढवणे आणि शांतता वाढवणे यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जावा.’ मात्र त्यांच्या इच्छेचं अनेकदा पालन झालं नाही. हा पुरस्कार देणाऱ्या समितीने संस्थापकाला जोरदार झटका दिला. अशी अनेक नावे समितीपर्यंत पोहोचली, जी मानवतेची हत्या करणारी होती. अशा काही नावांचाही सन्मान करण्यात आला, जी कोणत्याही प्रकारे निकषात बसत नाहीत. चला याची काही उदाहरणं सविस्तर जाणून घेऊयात.

  • 1939 मध्ये स्वीडनच्या एका खासदाराने नोबेल पुरस्कारासाठी चेष्टेने हिटलरचे नाव पाठवले होते. यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला.
  • तर, सोव्हिएत युनियनचा हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांना दोनदा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते आणि, तो विनोद नव्हता.
  • 1935 मध्ये, जर्मन पत्रकार कार्ल फॉन ओसिएकीला नोबेल शांतता पारितोषिक देण्याची घोषणा करण्यात आली. कार्लने हिटलरच्या युद्ध तयारीचा पर्दाफाश केला होता. हा पुरस्कार मिळाल्यावर हिटलर संतापला. त्यांनी जर्मन लोकांना नोबेल पारितोषिक मिळण्यास बंदी घातली. नोबेल पुरस्काराशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला.
  • 1938 आणि 1939 मध्ये तीन जर्मन शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक देण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु हिटलरच्या दबावामुळे त्यांना नकार द्यावा लागला. हिटलरच्या मृत्यूनंतर त्याला पुरस्कार मिळू शकले.

Ajit Pawar : अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी? देवगिरीवरील बैठकीत काय घडलं, तटकरे स्पष्टच बोलले…

नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती कोण?

जीन हेन्री ड्युनंट हे शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेले पहिले व्यक्ती होते. राष्ट्रांमध्ये शांतता आणि बंधुत्व वाढवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसची स्थापना केली.

भारतात पहिला नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला?

1901 मध्ये थोर कवी आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांना आशिया व भारत मधील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील ‘गीतांजली’ या काव्यग्रंथाबद्दल हे नोबेल पारितोषिक देण्यात आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT