नव्या संसदेचे शिल्पकार! कोण आहेत बिमल पटेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा देत नवीन संसद भवनात प्रवेशाची घोषणा केली. संसदेची नवीन इमारत तयार आहे. 28 मे रोजी पंतप्रधानांनी त्याचे उद्घाटन केले.
ADVERTISEMENT

New Parliament Architect :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा देत नवीन संसद भवनात प्रवेशाची घोषणा केली. संसदेची नवीन इमारत तयार आहे. 28 मे रोजी पंतप्रधानांनी त्याचे उद्घाटन केले. लोकसभा सचिवालयाच्या म्हणण्यानुसार नवीन संसद भवन विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी त्याची पायाभरणी केली होती. (Who is Bimal Patel the Architect of New Parliament)
नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रकल्पाने केले असून या इमारतीचे डिझाइन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. बिमल पटेल हे गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रसिद्ध इमारतींचे डिझाईन केले आहे. बिमल पटेल यांच्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा, जाणून घ्या ‘या’ भवनाची 5 वैशिष्ट्ये
बिमल पटेल कोण आहेत?
बिमल पटेल यांचा जन्म 31 ऑगस्ट 1961 रोजी गुजरातमध्ये झाला. ते सुमारे 35 वर्षांपासून आर्किटेक्चर, शहरी रचना आणि शहरी नियोजनाशी संबंधित काम करत आहेत.
याशिवाय बिमल पटेल हे अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठाचे अध्यक्षही आहेत. ते आर्किटेक्चर, प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट फर्म एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे नेतृत्व करतात.