पाकिस्तानसाठी बौद्ध राजाने घरदार सोडलं! बांग्लादेशी आईसोबत जेव्हा पहिल्यांदा…
1971 चे युद्ध सुरू झाले आणि शेवटी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण काळात त्रिदेव सिंह गप्प राहिले. इतके की, त्यांनी रझाकारांनी केलेल्या हत्याकांडावर टीकाही केली नाही. 1971 चे युद्ध सुरू झाले तेव्हा त्रिदेव रॉय यांना वाटले की त्यांनी योग्य बाजू निवडली. पण नंतर लवकरच त्यांना वास्तवाला सामोरे जावे लागले.
ADVERTISEMENT

1971 Pakistan vs Bangladesh War : सप्टेंबर 1972 ची ही गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत वाद सुरू होता. मुद्दा बांगलादेशचा होता. महासभेचे (Genral Assembly) सदस्य बनवावे, अशी बांगलादेशची मागणी होती. याला पाकिस्तान विरोध करेल हे स्वाभाविक होते आणि त्यांनी ते केले. पाकिस्तानने 21 सदस्यांचे संपूर्ण शिष्टमंडळ पाठवले होते. पण विशेष बाब म्हणजे या शिष्टमंडळाचा नेता काही महिन्यांपूर्वीपर्यंत बांगलादेशचा नागरिक होता. सामान्य नागरिक नव्हे तर राज्याचा राजा होता. (Why did a Buddhist king Tridev Roy chose pakistan during 1971 bangladesh war)
या राजाचा बौद्ध धर्मावर विश्वास होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजाचा सामना ज्या बांगलादेश शिष्टमंडळाशी होणार होता त्याचे नेतृत्व करणारी महिला राजाची आई होती. म्हणजेच राजमाता. बांगलादेश युद्धात हे माय लेक कसे समोरासमोर आले? बौद्ध राजाने आपले राज्य पाकिस्तानसाठी का सोडले? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
Nanded Hospital : नांदेडमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू का झाला? खरंच औषधी नव्हती का?
चटगाँग हिल आणि चकमा जमात
बांगलादेशच्या चटगाव (पूर्वीचे पूर्व बंगाल) प्रांतातून या कहाणीची सुरूवात होते. चटगावचा डोंगराळ भाग भारतातील त्रिपुरा आणि मिझोराम प्रदेशांना लागून आहे. येथे विविध जमाती राहतात. ज्यांना एकत्रितपणे झुम्मा म्हणतात. पेरणी आणि कापणीच्या पद्धतीमुळे येथील लोकांना हे नाव पडलं. कारण, त्याला झूम शेती म्हणतात. या शेती पद्धतीत झाडांच्या वरच्या फांद्या छाटल्या जातात. जेणेकरून सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकेल. यानंतर कापलेल्या फांद्या जाळून त्याची राख शेतात पसरवली जाते. आणि ते पुन्हा शेतीसाठी वापरले जाते.
या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या अनेक जमाती चटगावच्या डोंगराळ भागात राहतात. त्यापैकी चकमा हा सर्वात प्रमुख आहे. चकमा लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. असे मानले जाते की हे लोक गौतम बुद्धांच्या शाक्य परंपरेतून उद्भवले आणि मगध सोडल्यानंतर त्यांच्या पूर्वजांनी पर्वतांमध्ये आश्रय घेतला. त्यांची भाषा इंडो-आर्यन कुटुंबातील भाषेच्याही जवळ आहे, जी उत्तर भारतातील इतर भाषांसारखीच आहे.