Mahayuti Lok Sabha Seats : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात 'या' 16 जागा?
Mahayuti Lok Sabha Seats Allocation : महाराष्ट्रातील ४८ पैकी १६ जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांचं कसं होणार वाटप?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात १६ जागा
भाजप कसा काढणार तोडगा?
Mahayuti seats allocation for lok sabha election 2024 : लोकसभा जागावाटपावरून महायुतीमध्ये राजकीय घमासान बघायला मिळत आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या मतदारसंघांवर दावे करताना दिसत आहे. त्यामुळे जागावाटप करण्याचे मोठे आव्हान महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांसमोर उभे ठाकले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागा मागितल्या आहेत. यात काही भाजपकडे तर काही शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ आहेत. (Ajit Pawar's NCP has claimed 16 Lok Sabha constituencies.)
भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे २२ आणि १६ जागांची मागणी केली आहे. या जागांसाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे दिसत असून, अंतिम निर्णयानंतर कुणाला किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला हवे असलेले मतदारसंघ
गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहेत.
शिंदेंच्या शिवसेनाला कोणत्या जागा हव्यात?
रामटेक, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई , ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, धाराशिव (उस्मानाबाद), कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे.










