Shiv Sena UBT : "...हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा", ठाकरेंचा मोदींवर हल्ला

मुंबई तक

Uddhav Thackeray Latest news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नव्या घोषणेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे टीकास्त्र डागलं आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना नव्या घोषणेवरून डिवचलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेने नरेंद्र मोदी यांच्या नव्या घोषणेवर टीका केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतच माझे कटुुंब, मोदींची घोषणा

point

ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदींवर टीका

point

विविध मुद्द्यांवर बोट ठेवत सेनेने मोदींना सुनावलं

Shiv Sena UBT PM Modi : भारत हाच माझा परिवार आहे, अशी नवी घोषणा पंतप्रधान मोदींनी दिली. त्यांच्या याच घोषणेवरून ठाकरेंच्या शिवसेनेने खडेबोल सुनावले आहेत. विविध मुद्दे उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदींना लक्ष्य केले आहे.

सामनामध्ये 'मोदी परिवाराचा फुगा!' या मथळ्याखाली अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात मोदींनी केलेल्या नव्या घोषणेवर भाष्य करण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने अग्रलेखातून काय म्हटलंय... वाचा 9 महत्त्वाचे मुद्दे 

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे...

1) "भारत देश हाच आपला परिवार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुन्हा जाहीर केले. त्यात त्यांनी नवीन काय सांगितले? ‘देशातील 140 कोटी जनता हेच माझे कुटुंब’ ही मोदी यांची आवडती टेप आहे. मागील नऊ-दहा वर्षांत त्यांनी ती उठता बसता वाजवली आहे आणि त्यामुळे ती आता घासली गेली आहे. देशाची 140 कोटी जनतादेखील ती ऐकून कंटाळली आहे. मात्र हे समजून घेतील ते मोदी कसले? त्यामुळे ‘मेरा भारत, मेरा परिवार’ हे पालुपद काही ते सोडायला तयार नाहीत." 

2) "मोदी यांच्या आधीचे सगळे पंतप्रधानही या देशाचे कुटुंबप्रमुख म्हणूनच वावरले. तेव्हा देश हेच माझे कुटुंब असे म्हणणे म्हणजे आपण खूप वेगळे काहीतरी करीत आहोत, असे कोणी समजण्याचे कारण नाही. किंबहुना तेच तुमचे कर्तव्य असायला हवे. जनतेने सलग दोनदा त्याच विश्वासाने तुम्हाला निवडून दिले. मात्र हा विश्वास तुम्ही किती सार्थ ठरविला हा खरा प्रश्न आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp