Vidhan Sabha Election : मविआला रोखण्यासाठी महायुतीची स्ट्रॅटजी! विधानसभेसाठी अशी मत'पेरणी'?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर महायुतीने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महायुतीची स्ट्रॅटजी काय?
Mahayuti Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात जबर धक्का बसला. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 17 जागाच मिळाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या या निकालाने महायुती खडबडून जागी झाली आहे. आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीला कमीत कमी जागांवर रोखण्यासाठी महायुतीने आता मत 'पेरणी'च्या रणनीतीवर काम सुरू केले असून, नव्या योजनेची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुतीसाठी चांगले राहिले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आता नव्या योजनांची घोषणा करण्याची तयारी शिंदे सरकारने सुरू केली आहे.
महिला आणि तरुण मतांवर नजर
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात महायुतीला महिला मते अपेक्षित होती, तितक्या प्रमाणात मिळाली नाही. याच व्होट बँकेला आपल्या बाजूने आणण्यासाठी आता महायुतीची स्ट्रॅटजी असणार आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा?
जी माहिती आता समोर आली आहे, त्यानुसार मध्य प्रदेशात यशस्वी ठरलेल्या 'मुख्यमंत्री लाडली बहना' योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचे नियोजन महायुतीचे आहे. या योजनेची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांचे एक पथकही मध्य प्रदेशला गेले होते, अशी माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घोषणा
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली जाण्याची तयारी सुरू आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली जाणार असे सांगितले जात आहे. ही योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये दिले जाऊ शकतात.
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशात ठरली महत्त्वाची
महाराष्ट्रातील महिला मतांचा टक्का मोठा आहे. ही मते वळवण्यात यश आल्यास विधानसभा निवडणुकीचे निकाल लोकसभेपेक्षा वेगळे येऊ शकतात. ही योजना लागू झाल्यास त्याचा फायदा महिला मते पदरात पाडून घेण्यात होऊ शकतो.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'मी दिवसाला 60 सिगारेट प्यायचो', नानांनी सांगितली मुलाच्या मृत्यूनंतरची वेदना
मध्य प्रदेशात या योजनेचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नाही, तर लोकसभा निवडणुकीतही 29 पैकी 29 जागा भाजपने जिंकल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT