'आवडत असेल किंवा नसेल...', श्रीकांत शिंदेंकडून तुरुंगात असलेले भाजप नेते गणपत गायकवाडांच्या पत्नीचा प्रचार

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

श्रीकांत शिंदेंकडून गणपत गायकवाडांच्या पत्नीचा प्रचार

point

भाजप नेते गणपत गायकवाडांच्या पत्नींना देण्यात आलंय तिकीट

point

गणपत गायकवाडांनी शिवसेना नेते महेश गायकवाडांवर केलेला गोळीबार

Shrikant Shinde Ganpat Gaikwad Wife Bjp Candidate: कल्याण: कल्याण पूर्वेत महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचाराची धुरा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांभाळली आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना 'अफवांना बळी पडू नका...' असा सल्ला दिला. 'पक्षाचा आदेश हाच अंतिम आदेश असतो. पक्षाचा आदेश आहे महायुतीच्या उमेदवारास विजयी करायचे आहे. आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. याविषयी कोणालाही शंका येता कामा नये असे.' आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. (shrikant shinde participation in election campaign of jailed bjp leader ganpat gaikwad wife)

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलंय?

कल्याण पूर्वमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे (शिंदे गट) तत्कालीन नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. त्यावेळी महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.

हे ही वाचा>> Sharad Pawar: '...तर मला झोपच येणार नाही', पवारांनी 'त्या' गोष्टीचं गुपितच सांगून टाकलं!

दरम्यान, या मतदारसंघात मागील काही वर्षापासून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात राजकीय वैर सातत्याने पाहायला मिळत होतं. मात्र, गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकातच केलेल्या गोळीबारानंतर या सगळ्या प्रकरणाला गंभीर वळण लागलं. 

हे वाचलं का?

गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात असून त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे गोळीबारातून बचावलेले शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत सुलभा गायकवाडांविरोधात अपक्ष अर्ज दाखल करत मोठं आव्हान उभं केलं आहे.

ज्यानंतर शिवसेनेने (शिंदे गट) महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र, असलं तरी महेश गायकवाड यांना पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याची सध्या जोरदार चर्चा ही कल्याण पूर्व मतदारसंघात सुरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Balu Dhanorkar : 'माझ्या मुलाला मारून टाकलं', बाळू धानोरकरांच्या आईचे गंभीर आरोप! खासदार सुनेबद्दल म्हणाल्या...

यामुळे मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT