MVA Meeting Mumbai : मविआचे बडे नेते मुंबईत, हालचाली वाढल्या, जयंत पाटील यांच्या हातात स्टिअरींग
MVA Leaders Meeting in Mumbai : महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये बैठक झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सर्वांचं लक्ष

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक

मविआच्या नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास
Maharashtra Vidhan Sabha Elections : राज्यात सध्या सर्वांचं लक्ष विधानसभा निवडणुकांवर लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व धामधुमीला कधी ब्रेक लागणार आणि निकाल कधी स्पष्ट होणार याची आता सगळेच वाट पाहत आहेत. गेल्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडलं आणि उद्या 23 नोव्हेंबरला निकाल स्पष्ट होणार आहेत. राज्यात आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलनुसारत महायुतीचा बोलाबाला राहील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र हे सर्व अंदाज फेटाळून लावत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आमचंच येणार असून, 23 तारखेला 10 वाजेपर्यंत आम्ही मुख्यमंत्री जाहीर करु असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यानंतर मुंबईत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली देखील पाहायला मिळाल्या आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर, तसंच दोन प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीतून अनेक राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे भवितव्य ठरणार आहेत. उद्या लागणाऱ्या निकालांमध्ये कुणाला कौल मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता महाविकास आघाडी आणि महायुतीने पूर्वतयारी सुरू केल्याचं कळतंय. काल महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये बैठक झाली.
हे ही वाचा >> राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार! MVA ला फक्त 'इतक्या' जागा मिळणार, 'Chanakya Exit Poll'ने उडवली खळबळ