Manoj Jarange Vs Raj Thackeray : माझ्या नादी लागू नका, मी तुमच्यासारखा... मनोज जरांगे थेट बोलले, राज ठाकरे यांना इशारा दिला

मुंबई तक

मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना आरक्षण विषयावर बोलूच नका असं म्हणत इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावर मनसैनिक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

point

राज ठाकरेंनी आरक्षणावर बोलू नये...

point

मनोज जरांगे काय काय बोलले? वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीस यांचं ऐकूण या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी लागू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सभा घेत आहेत. यावेळी मराठा आरक्षणाचा लढा आणि त्याबद्दलची कायदेशी प्रक्रिया अशा मुद्द्यांवर राज ठाकरे आपल्या प्रचार सभेत बोलले होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे नेमकं आरक्षण कसं देणार आहेत असा सवाल केला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांना या विषयावर बोलूच नका असं म्हणत इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावर मनसैनिक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


राज ठाकेंबद्दल काय काय म्हणाले जरांगे?

"राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे आमचा, पण माझं एकच सांगणं आहे त्यांना की, त्यांनी या लफड्यात पडायची गरज नाही देवेंद्र फडणवीसांचं ऐकूण, यानंतर तुम्ही आरक्षण विषयात बोलू नका, समाजाचं अस्तित्व कसं टीकवायचं हे मला चांगलं माहिती आहे, मी तुमच्यासारखा अस्तित्व गमावून बसणारा नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी संताप व्यस्त केला. पुढं ते असंही म्हणाले की, 57 लाख नोंदी झाल्या असून 2 कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे तुम्ही या भागडीत पडू नका आणि याबद्दल बोलू नका" असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

 

राज ठाकरे जरांगेंबद्दल काय म्हणाले?

 

"राज्यभरात निघालेल्या मराठा मोर्चांचं काय झालं? का नाही आरक्षण मिळालं? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात, नंतर म्हणतात निवडणुका लढवू, नंतर म्हणतात लढवणार नाही पाडणार, तुम्हाला लढवायच्या तर लढवा, पाडायचेत तर पाडा, पण आरक्षण कसं देणार हे सांगा" असा सवाल राज ठाकरेंनी केला. पुढे ते म्हणाले की, "राजकीय पक्ष मराठा आरक्षणाबद्दल भूलथापा देतायत, कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळू शकत नाही, मी ही परिस्थिती जराेंगेंना सांगितली होती ते उपोषणाला बसलेले असताना. आरक्षणाचा विषय किचकट आहेत, त्यासाठी तुम्हाला लोकसभेत कायदा बदलून, सुप्रिम कोर्टातून आदेश घ्यावा लागले. उद्या फक्त महाराष्ट्राच्यासाठी आरक्षण द्यायला गेलं कुणी, तर प्रत्येक राज्यातल्या जाती उठतील, त्यामुळे हे होणार नाही हे सर्वांना माहिती आहे. जे लोक तुम्हाला आरक्षण देतो म्हणाले, तेव्हा त्यांना विचारा की कसं देणार आरक्षण? मागे मुख्यमंत्री शिंदे नवी मुंबईत म्हणाले जा तुम्हाला दिलं आरक्षण? असं देता येतं का? तुम्हाला अधिकार आहे का?" असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेंवरही निशाणा साधला होता. 


 

दरम्यान, विधानसभेत मराठा समाजाने नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दल आपण येत्या 10 तारखेला माध्यमांसमोर भूमिका मांडणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. गावागावात मराठा समाज आहे, आमच्यासाठी 10 दिवसांचा काळ खूप आहे, त्यामुळे आम्ही भूमिका मांडू आणि योग्य तो निर्णय घेऊ असं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp