Rahul Gandhi : गौतम अदानी यांना अटक करा... 'या' प्रकरणावरुन राहुल गांधींचे गंभीर आरोप
अमेरिकेतील आपल्या कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी सुमारे 2236 कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गंभीर आरोप
राहुल गांधी यांचाही निशाणा
अदानी यांना अटक करण्याची मागणी
Rahul Gandhi on Gautam Adani : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत 21 अब्ज रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी गौतम अदानींवर आरोप करत, ते अजूनही बाहेर कसे असा खोचक सवालही उपस्थित केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सातत्यानं याबद्दल बोलत होतो, पण अदानी यांची चौकशी झाली नाही, सरकार त्यांना संरक्षण का देतंय? अमेरिकेतील प्रकरणात अदानींनी भारतीय कायदे मोडल्याचाही आरोप आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा >>Nana Patole: निकालाआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच! पटोले म्हणाले, "काँग्रेसचा मुख्यमंत्री..."
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, भारतात अदानींना काहीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांना 10-15 कोटी रुपयांसाठी तुरुंगात जावं लागतं, पण अदानी बाहेर फिरत आहेत. तसंच त्यांनी अदानींच्या अटकेची मागणीही मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी फक्त गौतम अदानीच नाही, तर सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावरही आरोप केले. त्याच या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधार असल्याचं आम्ही आधीच सांगितलं आहे असं राहुल गांधी म्हणालेत. गौतम अदानी यांच्या शेअर्सच्या किमतीही माधबी बुच यांच्या नियंत्रणात असतात. त्यामुळे त्यांना त्या पदावरुन हटवण्याची मागणीही राहुल यांनी केली आहे. तसंच त्या पदावर कायम राहिल्यास फक्त बडे गुंतवणूकदार वाचतील, किरकोळ गुंतवणूकदार संपून जातील अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.










