Sanjay Raut : "सदा खोतच्या बापानेच...", शरद पवारांवरील टीकेनंतर राऊत भडकले, हसण्यावरुन फडणवीसांवरही बरसले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत सदाभाऊ खोत यांच्यावर बरसले

point

देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकरांवरही निशाणा

point

संजय राऊत यांनी थेट बाप काढला

Sanjay Raut मुंबई : सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार वारंवार म्हणत असतात त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, तर त्यांना महाराष्ट्राचा चेहरा त्यांच्यासारखा करायचाय का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. या टीकेनंतर आता संजय राऊत यांनी सदाभाोऊ खोत, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस या सर्वांवरच हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेली टीका केली, त्यावर देवेंद्र फडणवीस फिदीफिदी हसले असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. (sanjay raut angry on sadabhau khot gopichand padalkar and devendra fadnavis)

ADVERTISEMENT

 

संजय राऊत काय म्हणाले?

 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Supriya Sule : "फडणवीसांवर केस व्हावी, त्यांनी राजीनामा द्यावा"; अजितदादांची आर. आर. आबांवर टीका, सुप्रिया सुळे भडकल्या

 

"शरद पवार देशाचे सर्वोच्च नेते, सदा खोतच्या बापाने म्हणजेच नरेंद्र मोदींनी शरद पवार हे आपले कसे गुरू आहेत हे वारंवार सांगितलं, पवार साहेबांचं बोट पकडून कसं राजकारण केलं हे मोदींनी सांगितलं. भाजप सरकारने शरद पवार यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील कामाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असं म्हणणाऱ्या टमरेलांनी अभ्यास केला पाहिजे की त्यांनी पवार साहेबांच्या कामाचा लेखाजोखा घेतला पाहिजे. शरद पवार देशाच्या राजकारणातले भीष्म पितामह आहे आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या आजारपणावर अशापद्धतीनं बोलून तुम्ही महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घातली, या लायकीची माणसं फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केली असं राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेबांपर्यंत, विलासराव देशमुखांपासून वसंतदादापर्यंतची परंपरा आहे, या तुळशीवृंदावणात भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली, महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरूय, कधी गोपीचंद पडळकर, कधी सदाभाऊ खोत... शरद पवार यांच्यावर टीका करा, पण हे लोक कोणत्या नशेत असतात, देवेंद्र फडणवीस फिदीफिदी हसतात, यामुळे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा तिरस्कार करतोय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे" असं म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. 

 

हे ही वाचा >>Amol Mitkari : बोलणारा आणि हसणारे दोघेही.... शरद पवार यांच्यावर सदाभाऊंची टीका, मिटकरी मोजक्या शब्दात बोलले

 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते काल सांगलीमध्ये होते. सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवार आता म्हणतायत की मला महाराष्ट्राचं चेहरा बदलायचाय, त्यांना महाराष्ट्राचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? असं सदाभाऊ खोत म्हणाले. यानंतर अजित पवार यांनीही या टीकेवर संताप व्यक्त केलाय. तसंच अमोल मिटकरी यांनीही आता मोजक्या शब्दात आपला संताप व्यक्त केल्याचं दिसतंय. अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "बोलणारा आणि हसणारे दोघेही लक्षात ठेवतो आहोत. तुर्तास इतकेच.....!". अमोल मिटकरी यांनी या पोस्टमध्ये सदाभाऊ खोत यांनी पवारांवर बोलतानाचा व्हिडीओ टाकला आहे. यावेळी गोपीचंद पडळकर हसत आहेत, तर मंचावर देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे मिटकरींनी सर्वांवरच निशाणा साधल्याचं बोललं जातंय. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT