NCP Rap Song Video : सत्तेच्या लालसेने गद्दारीचा पदर धरला... शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रॅप साँगचा धुमाकूळ

मुंबई तक

दोन गुजरात्यांनी मिळून अख्खा देश काढला विकायला... ईडीच्या दबावाने माना लागल्या झुकालया... महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावरुन तरूणांच्या स्वप्नावर सत्ता लागली थुकायला... अशा शब्दात राष्ट्रवादीच्या या रॅपमधून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं रॅप साँग
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं रॅप साँग
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऊठ महाराष्ट्रा तू जागा हो पुन्हा... डोळ्यात तुझ्या स्वाभिमान जागू दे...

point

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं रॅप साँग

point

जे काकांचे नाही झाले, ते लोकांचे काय होणार? दादांवर निशाणा?


विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून, अगदी दंड थोपटून सगळे पक्ष मैदानात उतरलेत. गेल्या काही वर्षांमध्ये प्रचाराची स्टाईलही बदलत जाताना दिसतेय. डिजिटल प्रचारात आता रॅप साँगचाही समावेश झाल्याचं दिसतंय. प्रचारामध्ये प्रत्येक पक्षांनी आपली गाणी प्रभावीपणे वापरलीच होती, पण आता रॅपमधूनही मुद्दे मांडले जाताना दिसतायत. नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक रॅप साँग प्रसिद्ध केलं असून, त्यामधून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. "जे काकांचे नाही झाले ते लोकांचे कसे होणार?" असा खोचक प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवरुन हे रॅप साँग प्रसिद्ध करण्यात आलंय. (Sharad Pawar NCP New Rap Song on Uth Maharashtra tu Jaga Ho Punha)


हे ही वाचा >>Dheeraj Ghate Kasba : हिंदुत्ववादी सरकार हवंय, हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला... उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या धीरज घाटेंची नाराजी

 

राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या रॅपमध्ये शेतकरी, बेरोजगारी, गुजतला गेलेले विकास प्रकल्प अशा समस्यांवर बोट ठेवण्यात आलंय. तसंच त्यानंतर गद्दारी आणि इतर शब्दांचा उल्लेख करत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या रॅपची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. 


राष्ट्रवादीच्या रॅप, वाचा काय म्हटलंय? (NCP Rap Lyrics)

 

हे वाचलं का?

    follow whatsapp