PM Narendra Modi : "शिवतीर्थावरची मोदींची सभा रिकाम्या खुर्च्यानी गाजली", ठाकरेंच्या शिवसेनेकडून VIDEO ट्विट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदींच्या सभेवर निशाणा

point

PM मोदींच्या सभेला गर्दी नसल्याचा दावा

point

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून व्हिडीओ ट्विट

PM Narendra Modi Sabha : राज्यात विधानसभा निवडणुकांचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलं असून, सर्वच पक्षांनी आता प्रचारासाठी ताकद पणाला लावली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे राज्यातील बडे नेते दंड थोपटून प्रचारासाठी मैदानात आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचारासाठी शिंदे, फडणवीस यांच्यासह दिल्लीतील बडे नेते प्रचारात उतरले आहेत. काल 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. शिवाजीपार्कवर या सभेसाठी भव्यदिव्य व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या सभेला ठेवण्यात आलेल्या पूर्ण खुर्च्या भरल्या नाहीत असा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ट्विट केला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> PM Modi: '...तर कधी हॉस्पिटलला जावं लागणार नाही', मुंबईत येताच PM मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
 

मतदानाचा दिवस अगदी पाच दिवसांवर आला आहे. तसंच प्रचारामधील भाषणांची धारही वाढत जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मोदींनी काल महाराष्ट्रात तीन सभा घेतल्या.छत्रपती संभाजीनगर, पनवेल आणि मुंबईमध्ये सभा पार पडली. पंतप्रधान मोदींची शेवटची सभा मुंबईच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडली. 8 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भाषणं पार पडली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्विट करण्यात आला आहे. 

 

हे वाचलं का?

 

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी आलो : मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरुन केलेल्या भाषणात महाविकास आघाडीवर आरोप करत महायुतीने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तसंच आज आपण इथे फक्त प्रचारासाठी आलो नसून, येणाऱ्या काळात महायुती सरकार स्थापन होईल, त्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचं म्हटलं. 

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना आघाडी सरकारच्या काळात मुंबई किती असुरक्षित होती याची आठवण करुन दिली. "मुंबई शहाराने दिर्घकाळ दहशतवादाचं संकट झेललं आहे. दहशतवादामुळे मिळालेल्या जखमांना येथील लोक अजूनही विसरले नाहीत. लोकल, बसमध्ये लोक घाबरून जात होती, अशी एक वेळ होती. आपल्या कुटुंबाची भेट होईल की नाही, असं लोक विचार करत होते. घरी परतणार की नाही? असा प्रश्न त्यांना पडत होता. असं मोदी म्हणाले. पण मागील काही वर्षात लोकांच्या सुरक्षित वाटायला लागलं आहे. कारण तेव्हा सरकार वेगळं होतं. आता मोदी आहे. काँग्रेस सरकार होतं तेव्हा मुंबईत दहशवादी घटना घडत होत्या. ठिकठिकाणी तुम्हाला संशयास्पद वस्तूंची भीती होती. बसमध्ये ट्रेनमध्ये बसल्यावर सूचना येत असायच्या. कुकर, टिफीन बॉक्सची भीती वाटत होती. जर संशयास्पद वस्तू दिसल्या, तर लगेच पोलिसांना कळवा, असं म्हटलं जात होतं. आता हे सर्व बंद झालं आहे,  झालं की नाही? असं सवाल मोदींनी उपस्थितांना केला. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT