Uddhav Thackeray : छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर फडणवीसांना... बुलढाण्यातून उद्धव ठाकरेंची खोचक टीका
बुलढाण्यामध्ये जयश्री शेळके यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंचा बुलढाण्यातून फडणवीसांवर निशाणा
गद्दार म्हणत संजय गायकवाड यांचं नाव न घेता टीका
जालिंदर बुधवत यांना आमदार करण्याचा शब्द
Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा विधानसभेमध्ये जयश्री शेळके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. तसंच सर्वांनी मिळून जयश्रीताईंना आमदार करायचं असं आवाहन केलं, तसंच जयश्री शेळके आमदार झाल्या, की जालिंदर बुधवत यांना आमदार करण्याचं काम माझं असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला. जालिंदरला मी एक शब्द टाकला की थांबा आणि ते थांबले, त्यामुळे त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याची काळजी मी घेईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर फडणवीसांना सहन होत नाही असं ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>PM Narendra Modi Dhule : एक है तो, सेफ है.... धुळ्याच्या सभेत मोदींचा नवा नारा, नेमका अर्थ काय?
तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, पण घात झाला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पुढे ते असंही म्हणाले की, जयश्रीताई कशा आहेत हे तुम्हाला माहिती आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी जयश्री शेळके यांच्यावर विश्वास व्यक्त केला. पुढे शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 40 जणांच्या टोळीने दरोडा टाकला. त्यांनी आपला पक्ष चोरून नेला, आणि आता म्हणतात हा पक्ष आमचा. ते गद्दारच आहेत, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत. आता पन्नास खोके इज नॉट ओके. हे आता हारले तरी त्यांनी भरपूर जमा करु ठेवलंय,तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं, गद्दार आमदार जिथे पळून गेले त्या सुरतमध्येही शिवरायांचं मंदिर बांधणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांना सहन होत नाही, त्यामुळे ते म्हणतात की मुंब्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बनवून दाखवा. हा मुंब्रा त्याच जिल्ह्यात आहे, जिथून तुमचा मुख्यमंत्री केला आहे. त्या जिल्ह्यात मंदिर बांधणं तुम्हाला अवघड का वाटतं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT