Worli Vidhan Sabha Election 2024: आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा, वरळीची जागा धोक्यात?
Worli Vidhan Sabha Election 2024 Aaditya Thackeray: लोकसभेत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा विचार केल्यास वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) उमेदवाराला कमी मताधिक्य मिळालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी वरळीचा पेपर नक्कीच सोप्पा नसेल.
ADVERTISEMENT
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Worli Constituency: मुंबई: लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राची सत्ता कोण मिळवणार याची जोरदार चर्चा सुरूय. महायुती आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ नेमका कोणाचा? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर यातील वरळी विधानसभेत या मतदारसंघात नेमकं कोण जिंकणार याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.
ADVERTISEMENT
दक्षिण मुंबई मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे उमेदवार अरविंद सावंत यांनी केवळ 52 हजार 673 मताधिक्याने विजय मिळवला. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार यामिनी जाधव यांना केवळ 3,42,982 मतं मिळाली. पण या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, विधानसभेसाठी आदित्य ठाकरेंना बरंच झुंजावं लागू शकतं.
हे ही वाचा>> कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई
विधानसभा निवडणूक ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी नक्कीच सोप्पी नाही, असं येथे झालेल्या मतदानातून समजतं आहे. मुंबई-दक्षिण लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.
हे वाचलं का?
मुंबई-दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून यामिनी जाधवांना उमेदवारी दिलेली. ज्या विद्यमान आमदारही आहेत. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अरविंद सावंतांना उमेदवारी दिलेली. पण या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत खासदारकीची हॅटट्रिक केली आहे.
हे ही वाचा>> 'या' 5 नेत्यांपैकी कोण होऊ शकतो उपमुख्यमंत्री?, पण...
मुंबई-दक्षिण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा वरळी हा मतदारसंघ देखील येतो. जिथे शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांना नाममात्र मताधिक्य मिळालं आहे.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांच्या वरळी या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?
अरविंद सावंत (शिवसेना - UBT) - 64 हजार 844 मतं मिळाली
यामिनी जाधव (शिवसेना - शिंदे गट) - 58 हजार 129 मतं मिळाली
ADVERTISEMENT
2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघात 89 हजार 248 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुरेश माने यांना 21 हजार 821 मतं मिळाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT