राज्यातील ब्राह्मण संघटनांना शरद पवारांकडून चर्चेचं निमंत्रण, काही संघटनांचा विरोध
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार हे ब्राह्मण विरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. राज ठाकरे यांनीही शरद पवार जातीयवादी आहेत असा आरोप केला आहे. या बैठकीला काही संघटनांनी विरोध केला आहे. मात्र इतर संघटना तयार आहेत असं कळतं आहे. आनंद दवे यांचं […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार हे ब्राह्मण विरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. राज ठाकरे यांनीही शरद पवार जातीयवादी आहेत असा आरोप केला आहे. या बैठकीला काही संघटनांनी विरोध केला आहे. मात्र इतर संघटना तयार आहेत असं कळतं आहे.
आनंद दवे यांचं म्हणणं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी (२१ मे) राज्यातील ब्राम्हण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. शरद पवार यांनी आमंत्रित केले आहे ही माहिती ब्राह्मण महासंघ अध्यक्ष आनंद दवे यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे दुषित झालेलं वातावरण निवळण्याचा या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे.
मागील महिन्यांपासून राष्ट्रवादी ब्राह्मण समाजाच्याविरोधात आहे, असा अपप्रचार केला गेला. जी राष्ट्रवादीची बाजू नाही, भूमिका नाही, असे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल केले गेले. त्याचमुळे ब्राह्मण समाज राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र झालेले गैरसमज दूर व्हावे, यासाठी शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय. शनिवारी ही बैठक पुण्यात पार पडणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.