रात्री 10 ते सकाळी 6 शहरात भोंग्यांना बंदी ! मुंबई पोलिसांचा महत्वाचा निर्णय
भोंग्यांवरुन राज्यात सुरु झालेलं राजकारण टिपेला पोहचलेलं असताना शहरातली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरात भोंगे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार यापुढे सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण […]
ADVERTISEMENT

भोंग्यांवरुन राज्यात सुरु झालेलं राजकारण टिपेला पोहचलेलं असताना शहरातली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरात भोंगे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार यापुढे सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर-भोंगे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
१५ दिवसांत ७०० चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावरून ‘डिलिट’; यशस्वी यादवांची धक्कादायक माहिती
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. याव्यतिरीक्त कंट्रोल रूमवर ध्वनीप्रदूषणासंदर्भात जर एखादा कॉल आला तरीही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.