Ramesh Latke : शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Shiv sena Mla Ramesh latke Death : कुटुंबिय खरेदीसाठी बाहेर गेलेलं असताना घडली घटना
Ramesh Latke : शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार (Shiv sena MLA) रमेश लटके (Ramesh Latke) यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार रमेश लटके दुबईत (Dubai) त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते. बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) त्यांचं निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं बुधवारी रात्री निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार रमेश लटके यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यावेळी त्यांचे कुटुंबिय खरेदीसाठी बाहेर गेलेलं होतं.

Ramesh Latke : शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
धक्कादायक ! शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

घरात एकट्याच असलेल्या लटके यांना बुधवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे.

रमेश लटके यांनी २०१४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी यांना पराभूत करून विधानसभेत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला होता. रमेश लटके बराच काळ मुंबई महापालिकेत नगरसेवकही होते.

Ramesh Latke : शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

रमेश लटके यांच्या निधनाचं वृत्त मुंबईत धडकताच शिवसेना कार्यकर्ते शोकाकूल झाले. त्यांच्या समर्थकांनाही या वृत्ताने मोठा धक्का बसला. आमदार रमेश लटके मागील काही दिवसांपासून कुटुंबासह दुबईत वास्तव्यास होते. दुबईत असतानाच बुधवारी त्यांनी अखेरचा श्वस घेतला.

रमेश लटके यांचं पार्थिव मुंबईत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. लटके यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत आणण्यात येणार असून, उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ramesh Latke : शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार आणि राष्ट्रवादीच्या आमदाराची चौकशी,जाणून घ्या नेमकं काय घडलं?

२०१४मध्ये पहिल्यांदाच ते विधानसभेत गेले. अनेक वेळा नगरसेवक राहिलेल्या रमेश लटके यांचं नाव शिवसेनेच्या मुंबईथील आक्रमक नेत्यांमध्ये घेतलं जायचं. मुंबईत महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच रमेश लटके यांचं निधन झालं. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in