Mumbaitak Baithak 2024 : नेते पक्ष सोडतायत, तुम्ही राज ठाकरेंची साथ का सोडली नाही? बाळा नांदगावकर म्हणाले...
Bala Nandgaonkar Mumbaitak Baithak 2024 : लोकसभेत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेने विधानसभेत स्वबळाचा नारा दिला आहे. यामागची मनसेची रणनीती काय आहे? याबाबत आता बाळा नांदगावकर यांनी मुंबई Tak बैठकीत मनसेची भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनसेची विधानसभेची रणनीती काय?
राज ठाकरेंची साथ का सोडली नाही?
मराठा आरक्षणावर मनसेची भूमिका काय?
Bala Nandgaonkar Mumbaitak Baithak 2024 : ''राजकारणात संधी खूप येत असतात. आणि संधी ही साधण्यासाठीच असते आणि काही लोक साधतात सुद्धा, परंतू राज ठाकरेंनी मला पक्ष काढल्यानंतर निमंत्रण दिलं नव्हतं,त्यांनी महाराष्ट्राला अर्पण केलं होतं. त्यामुळे मी त्यांना अर्पण केलं. बाळासाहेबांना मातोश्री जाऊन सांगून अर्पण केलं. म्हणून मी त्यांच्यासोबत उभं राहिलो आणि आजही राहिन आणि उद्याही राहीन,असे मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मुंबई Tak बैठकीत (Mumbaitak Baithak 2024) सांगितले. (mns bala nandgaonkar at mumbaitak baithak 2024 on raj thackeray mns maratha reservation manoj jarange patil maharashtra politics)
भाजपला दिलेल्या पाठिंब्याचा किती फायदा झाला?
महाविकास आघाडीने युतीसाठी आम्हाला निमंत्रण दिले नव्हते. राज ठाकरेंना ज्या गोष्टी पटतात त्या भूमिका ते घेतात. आणि त्यांना एखादी गोष्ट चुकीची वाटली की ती राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता निर्णय घेतात. आता बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी कोणतीही बोलणी आमची झाली नव्हती. पण आम्ही एक दोन सीट मागितल्या होत्या. त्यात वाटाघाटी होतात न होता, पण देशाला सक्षम आणि कणखर नेतृत्व मिळावं आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Sunil Shukre at Mumbai Tak Baithak 2024: ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा...: सुनील शुक्रे
स्वबळाचा नारा का दिला?
आम्ही आतापर्यंत स्वबळावर लढा दिला आहे.2009 ला आमचा निकाल चांगला लागला. त्यानंतर थोडीशी उतरंडी लागली,असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. लोकसभेच्या वेळी आम्ही विधानसभेवर कुठलीही चर्चा केली नव्हती. शिंदे साहेब म्हणतात आम्हाला 120 जागा पाहिजे. अजित पवार म्हणतात आम्हाला 80-90 जागा पाहिजे. जागा 288 मग भाजपला किती राहणार? त्यामुळे एक दोन तीन भावंड एकत्र आली, आता आम्ही तिकडे जाऊन काय करणार? म्हणून आम्ही स्वबळाचा निर्णय घेतल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbaitak Baithak 2024 : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं? वर्षा गायकवाडांनी मांडली काँग्रेसची भूमिका
मराठा आरक्षणावर मनसेची भूमिका काय?
अंतरावली सराटीत पहिल्यांदा राज ठाकरे गेले होते.त्यामुळे राज ठाकरेंनी जरांगेंना स्पष्ट सांगितलं होतं ''तुम्हाला आरक्षण काही मिळणार नाही'', कारण हा विषय घटनेशी आणि केंद्राशी संबंधीत आहेत. मुठभर लोकच मराठा समाजातील मजबूत बाकी ९० टक्के गरीब आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच बाळासाहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे. अशीच भूमिका गोपिनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी घेतली होती. राज ठाकरेंनी पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीतही त्यांनी निकषावर द्यावं हेच सांगितलं होतं, असे देखील बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT