Sunil Shukre at Mumbai Tak Baithak 2024: ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा...: सुनील शुक्रे
Sunil Shukre at Mumbai Tak Baithak 2024: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी करणाऱ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा असा सल्ला राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षांनी मुंबई Tak बैठकीत बोलताना मनोज जरांगेंना दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठा आरक्षणाबाबत सुनील शुक्रेंचं परखड मत

मनोज जरांगेंना राज्यघटनेचा अभ्यास करण्याचा सल्ला
Manoj Jarange and Maratha Reservation: मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रात सतत धगधगता आहे. एकीकडे शिंदे सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलेलं असलं तरीही मराठा आंदोलक मनोज जरांगे मात्र ओबीसीमधून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत. असं असताना यामध्ये नेमक्या संविधानिकदृष्ट्या काय अडचणी आहेत किंवा संविधानात काय तरतुदी आहेत. यावर राज्य मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. 'मुंबई Tak बैठक' या विशेष कार्यक्रमात बोलताना शुक्रेंनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांना राज्यघटनेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. (sunil shukre at mumbai tak baithak 2024 those seeking reservation from obc should study the constitution said sunil shukre chairman of the state backward class commission maratha reservation manoj jarange)
पाहा मुंबई Tak बैठकीत सुनील शुक्रे यांनी मनोज जरांगेंना काय दिला सल्ला?
आरक्षणाचा जो कोटा आहे ते पॉलिसी मॅटर आहे. आरक्षण द्यावं की न द्यावं हे देखील पॉलिसी मॅटर आहे. आरक्षण दिलं तर ते कोणत्या आधारावर द्यावं हे देखील पॉलिसी मॅटर आहे. यावर कोणीही भाष्य करणं हे योग्य नाही. मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं आहे ते सामाजिक आणि शैक्षणिक मागास या आधारावर देण्यात आलं आहे. जर संविधानाचा आपण अभ्यास केला तर त्यात फक्त तीनच प्रवर्ग आहे. एक
अनुसचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आणि इतर मागासवर्गीय आहेत.
हे ही वाचा>> Praful patel Mumbaitak Baithak: अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? प्रफुल पटेल म्हणाले...
संविधानानुसार हे तीनच प्रवर्ग आहेत. असं असताना असं म्हणणं की, या प्रवर्गातून आरक्षण हवं किंवा त्या प्रवर्गातून आरक्षण हवं तर जे प्रवर्ग तयार झाले आहेत की, ओबीसी, विमुक्त जाती-जमाती हे सगळ्या मागासवर्गीय प्रवर्गातच येतात.
त्यामुळे जो कोणी अशी मागणी करतात की, विशिष्ट प्रवर्गातून आरक्षण द्यावं त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करावा. तेव्हा त्यांना लक्षात येईल की, तीनच प्रवर्ग आहेत. त्यामधील तिसरा प्रवर्ग हा मागासवर्ग हा आहे. त्यात उपश्रेणी झाल्या आहेत. असं म्हणत सुनील शुक्रे यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे.
'मुंबई Tak बैठकी'चा हा भरगच्च कार्यक्रम
सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे या सोहळ्याचे पहिले प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दुसरं सत्र पार पडणार आहे.