‘मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार’; धमकी देणाऱ्याला अटक, नावंही आलं समोर
मुंबई पोलिसांना मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकीचा कॉल आला आहे. लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा दावाही कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केला आहे.
ADVERTISEMENT

Threat call of Serial Bomb Blast in Mumbai : मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार आहे, अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली. (Threat call gets mumbai police control room that serial bomb blast will be in mumbai)
राज्यात इसिस महाराष्ट्र मोड्यूल केस प्रकरण चर्चेत असतानाच रविवारी मुंबई पोलीस दलात धमकीचा एक कॉल आला. या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून सांगितले की, मुंबई साखळी बॉम्बस्फोट होणार आहेत.
रविवारी (6 ऑगस्ट) सकाळी हा धमकीचा कॉल आला. हा कॉल एका महिला पोलीस अधिकाऱ्याने घेतला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने असा दावा केला की, मुंबईतील एका लोकल ट्रेन मध्ये बॉम्ब ठेवला आहे. अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!
कोणत्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला आहे, याबद्दल माहिती विचारली असता, समोरच्या व्यक्तीने कोणतेही उत्तर दिले नाही.










