मुंबईकरांच्या चोरलेल्या गाड्या जातात गुजरात, मध्यप्रदेशात.. पण त्यांचं होतं तरी काय?
मुंबईमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढलेलं असून या प्रकरणी दिवसाला 5 ते 6 तक्रारी नोंद होत असतात. आता अशाप्रकारे चोरलेली वाहने नेमकी जातात तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो, जाणून घ्या सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ?

चोरलेल्या वाहनांचं पुढे होतं तरी काय?

मुंबईमध्ये दररोज किती वाहने चोरीला जातात?
Mumbai Vehicle Theft: मुंबईसारख्या शहरात दररोज अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद होत असते. अशातच, मुंबईमध्ये दररोज वेगवेगळ्या वस्तूंची किंवा वाहनांची चोरी झाल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. याप्रकरणी दररोज बऱ्याच तक्रारी दाखल होत असतात. विशेषत: वाहन चोरीबद्दल सांगायचं झाल्यास, या प्रकरणी दिवसाला 5 ते 6 तक्रारी नोंद होत असतात. यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.
गेल्या चार महिन्यात मुंबईत वाहन चोरीचे सुमारे 703 गुन्हे नोंद झाल्याची बातमी मिळाली आहे. तसेच, मुंबईत दिवसाला 7 ते 8 वाहन चोरी होत असल्याचं ऐकायला मिळतं. या अशा घटनांमुळे मुंबईकरांच्या डोक्याचा ताप वाढत आहे.
आता अशाप्रकारे चोरलेली वाहने नेमकी जातात तरी कुठे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.
हे ही वाचा: नवरा टेरेसवर झोपला होता, 3 पोरांच्या आईनं प्रियकराला बोलावलं, रुममधून आवाज आला अन्...
चोरलेली वाहने कुठे जातात?
खरंतर, मुंबईतून चोरी केल्या जाणाऱ्या गाड्या या बहुतेक मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी नेण्यात येतात. तसेच, बहुतांश वेळा चोरी केलेल्या गाड्यांचाच वापर गुन्हे घडवून आणण्यासाठी केला जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.