Mulund : मराठी महिलेला ऑफिससाठी नाकारली जागा, पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांची ‘अ‍ॅक्शन’

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbai Mulund West Trupti Deorukhkar Shared Video Denying office space To Marathi woman In mulund
Mumbai Mulund West Trupti Deorukhkar Shared Video Denying office space To Marathi woman In mulund
social share
google news

Mumbai Mulund West Trupti Deorukhkar Shared Video : मुंबई उपनगरातील मुलुंड पूर्वमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी सोसायटीत जागा नाकारण्यात आली. गुजराती पिता-पुत्राने मराठी माणसांना घर देणार नाही, असं म्हणत धक्काबुक्की केली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात असून, पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे. (The Mulund Police have detained both the accused. The names of this father and son are Praveen Thakkar and his son Nilesh Thakkar.)

मुलुंड पूर्वमध्ये तृप्ती देवरूखकर या ऑफिससाठी जागा शोधत होत्या. त्या शिवसदन सोसायटीमध्ये गेल्या. त्यावेळी त्यांना गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घर देणार नाही, असं सांगितलं. इतकंच नाही, तर माझा हात पकडला आणि पतीला धक्काबुक्की केली, असा आरोप तृप्ती देवरुखकर यांनी केला. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या मुद्द्यावरुन राजकारण तापलं.

गुन्हा दाखल, पिता-पुत्राला अटक

तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी तृप्ती देवरुखकर यांच्याशी संपर्क केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘विधान परिषदेचा फॉर्म भरलेला, शेवटच्या क्षणी सांगितलं आता…’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

तृप्ती देवरुखकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुजरातील पिता-पुत्राविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून मुलुंड पोलिसांनी प्रवीण ठक्कर आणि नीलेश ठक्कर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 341, 323, 504 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मुलुंड पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्रीच ताब्यात घेतलं.

मनसेचा दणका, मागायला लावली माफी

या घटनेनंतर मनसेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचबरोबर म्हटलं आहे की, “तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> MP Election: भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं ‘देश तोडणारे खलनायक’ म्हणून चित्रं उभं केलं जातं आणि आपलेच मराठी जाणते मान्यवर आम्हाला संकुचित ठरवून मोकळे होतात”, असा मुद्दा मनसेनं उपस्थित केलाय.

ADVERTISEMENT

“आज तृप्ती देवरुखकर ह्यांना आलेल्या अनुभवानंतर तत्परतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावून गेली. त्या माणसाला जाहीर माफी मागायला लावली. पण हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण हिणवणं, तुच्छ लेखणं, तुसडेपणाने वागवणं हे मराठी माणूस रोज मुंबईच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अनुभवत असतो पण मुंबई-महाराष्ट्रावर इतकी वर्ष राज्य करूनही कोणताही राज्यकर्ता इतरांची मतं जातात म्हणून ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. मराठी जनांनी हे लक्षात घ्यायला हवे”, असं मनसेनं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT