आशिष शेलार पुन्हा म्हणाले, ‘आदू बाळ; कवितेतून आदित्य ठाकरेंच्या वर्मावर ‘बाण’
छत्रपती शिवाजी महाराज वाघनखे वाद : आशिष शेलारांनी आदू बाळ म्हणत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचलं. शेलारांबरोबर चित्रा वाघ यांनीही ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Politics latest news : लंडनमधील वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. पण, यावरून विरोधकांनी सरकारला सवाल केले. शिवसेना (युबीटी) आमदार आदित्य ठाकरेंनी लंडनच्या म्युझियममधील वाघनखं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची आहे का? असा प्रश्न केला. त्यानंतर भाजपकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलंय. आदू बाळ म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी डिवचलं होतं. शेलारांनी आता कवितेतूनच आदित्य ठाकरेंना चिमटे काढले आहेत. (Ashish Shelar called Aaditya Thackeray child over Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh controversy)
ADVERTISEMENT
आशिष शेलारांचा कवितेतून आदित्य ठाकरेंवर बाण
वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?
आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय
हे वाचलं का?
इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?
महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय?
आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का?
यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?
ADVERTISEMENT
अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?
अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> डुकरांना दिला जाणारा गहू भारतात आला अन् ‘हरित क्रांती’ची पडली ठिणगी!
वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीयइथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2023
चित्रा वाघांचं ही ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र
याच मुद्द्यावरून भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही टीका केलीये. “आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे. छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला, त्याच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत. पण, त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे”, असं चित्रा वाघांनी म्हटलं आहे.
हेही वाचा >> “आम्हाला चिरडून टाका, आर्मी बोलवा, पण…”, शिंदेंना चँलेज, संजय राऊत का संतापले?
“आपल्या देदीप्यमान इतिहासाशी संबंधित एक मौल्यवान ऐवज या मावळ मातीत दाखल होतोय, त्याचा अभिमान बाळगायचं सोडून वाघनखं आणणाऱ्यांचा दुस्वास करायचा, हे मोठंच करंटेपण आहे. पण, काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार…?”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT