घटस्थापनेच्या मुहुर्तावर विठूमाऊलीचं दार भक्तांसाठी खुलं, दररोज १० हजार भाविकांना मिळणार दर्शन

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाचीही सोय
घटस्थापनेच्या मुहुर्तावर विठूमाऊलीचं दार भक्तांसाठी खुलं, दररोज १० हजार भाविकांना मिळणार दर्शन

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि समस्त वारकरी संप्रदायासाठी महत्वाचं स्थान असलेल्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत घटस्थापनेच्या मुहुर्तावर मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या नियोजनावर चर्चा झाली.

कोविडच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुन प्रत्येत दिवशी फक्त १० हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोविडची चाचणी करणं गरजेचं नसलं तरीही थर्मल स्क्रिनींग आणि ऑक्सिजनची तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडलं जाईल अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

घटस्थापनेच्या मुहुर्तावर विठूमाऊलीचं दार भक्तांसाठी खुलं, दररोज १० हजार भाविकांना मिळणार दर्शन
साईबाबा मंदिर होणार खुलं; कुणाला दिला जाणार प्रवेश?, दर्शनासाठीची नियमावली जाहीर

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे . विजया दशमी पासून सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे . तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.

दर तासाला सातशे ते एक आठ हजार भाविकांना दर्शन दिले जाईल . यामध्ये 50 % ऑनलाईन आणि 50 % ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे . दहा वर्षाखालील मुले , ६५ वर्षावरील नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शन मिळणार नाही . अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.