क्रूझ ड्रग्स प्रकरण: आणखी एका परदेशी नागरिकाला अटक, आर्यन खानच्या अडचणीत वाढ?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Cruis Drugs Case) एनसीबीने गोरेगाव येथून आणखी एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. तपास यंत्रणेने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त केले आहे. एनसीबीने याबाबत माहिती देताना सांगितले की, तो मूळचा नायजेरियाचा नागरिक असून त्याचं नाव ओकारो औजामा असं आहे. असे म्हटले जात आहे की, हा परदेशी नागरिक ड्रग्स प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा आहे.

NCB साठी त्याची अटक ही खूप महत्त्वाची ठरु शकते. त्याला लवकरच न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे. या अटकेसह क्रूझ ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आली आहे.

एनसीबी मुंबईच्या पथकाने वेस्टिन गेट, ओबेरॉय गार्डन सिटी, इंटरनॅशनल बिझनेस पार्क, यशोधम, गोरेगाव येथे पाळत ठेवली होती. त्यानुसार काल (09 ऑक्टोबर) रोजी रात्री उशिरा कोकेनसह ओकेरो ओझमा नावाच्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या गुन्ह्यातील ही विसावी अटक आणि परदेशी नागरिकांची दुसरी अटक आहे. एनसीबी मुंबई सर्व आरोपींच्या चौकशीच्या आधारे या प्रकरणाचे परदेशी संबंध शोधण्याचा प्रयत्न केले जात आहे. तसाप पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.

दुसरीकडे क्रूज ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (SRK’s Son) आर्यन खान (Aryan Khan) याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. NCB कोठडीत 6 रात्र घालवल्यानंतर आता दोन रात्र त्याला न्यायालयीन कोठडीत म्हणजेच आर्थर रोड जेलमध्ये काढव्या लागल्या आहेत. त्यातही त्याला जामीन नेमकी कधीपर्यंत मिळू शकेल याबाबत देखील काही स्पष्टता नाही.

ADVERTISEMENT

त्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात त्याची जामीन याचिका दाखल केली होती. परंतु त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. म्हणजेच आर्यनला किमान आणखी एक रात्र आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागणार आहे. जर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला तरच तो तुरुंगातून बाहेर येऊ शकेल. पण जर या कोर्टाने देखील जामीन नामंजूर केला तर मात्र आर्यनच्या अडचणी अधिक वाढू शकतात.

ADVERTISEMENT

एनसीबी आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करणार

दरम्यान, एनसीबी आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करणार आहे. खरं तर, ड्रग्स प्रकरणात अटक झालेला अचित कुमारही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावेळी जेव्हा आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल तेव्हा एनसीबी न्यायालयात युक्तिवाद करू शकतो की त्या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहेय त्यामुळे आर्यनला जामीन देऊ नये. जर न्यायालयाने एनसीबीचा हा युक्तिवाद मान्य केला तर आर्यनला आणखी काही दिवस तुरुंगात काढावे लागतील.

‘मनिष भानुशाली-KP गोसावींना 2 ऑक्टोबरपर्यंत ओळखतच नव्हतो’, समीर वानखेडेंचं नवं स्पष्टीकरण

एनसीबीने अचित कुमारच्या न्यायालयीन कोठडीला विरोध केला नाही

अचित कुमारला अटक केल्यानंतर, जेव्हा NCB ने त्याला न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने त्याला NCB च्या कोठडीत न पाठवता थेट न्यायालयीन कोठडीत पाठवले. यावेळी एनसीबीने काहीही आक्षेप घेतला नाही. कारण कोर्टाने आधीच आर्यनला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. अचित आणि आर्यन हे एकाच कारागृहात असल्याने NCB साठी दोघांची एकत्र चौकशी करणे खूप सोपे जाईल. याच आधारावर एनसीबी सत्र न्यायालयात आर्यनच्या जामिनाला विरोध करू शकतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT