गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा, महाराष्ट्र पोलिसांची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी पोलीस नक्षल्यांमध्ये मोठी चकमक उडाली होती या भीषण चकमकीत पोलिसांनी आत्तापर्यंत 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीदरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील जखमी झाले आहेत.

त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टर ने तात्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे, मारल्या गेलेल्या नक्षल्यात संघटनेचा मोठा के कॅडर असल्याचंही कळतं आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांना नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश आले होते. खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पोलिसांनी पकडलं होतं. खोब्रामेंढा येथे झालेल्या सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. याच चकमकीत हा नक्षलवादी जखमी झाला होता. किशोर कावडो असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

ADVERTISEMENT

गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला – रानकट्टा जंगल परिसरात आज सकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. विशेष म्हणजे रानकट्टा हे गाव गडचिरोली जिल्ह्यात असून हिंडकोटोला हे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी होत्या. घटनेनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. आतापर्यंत 26 नक्षलवाचे प्रेत सापडले असून घटनास्थळी आताही सर्चींग ऑपरेशन सुरू आहे.

ADVERTISEMENT

कोण आहेत सी-60 कमांडो?

गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.

काय म्हणाले आहेत गृहमंत्री?

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.

“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT