सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला
सिंधुदुर्ग: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी तब्बल 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 30 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. तर 31 डिसेंबरला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी तब्बल 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 30 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. तर 31 डिसेंबरला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत. केंद्रात नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवरील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे बँकेची ही निवडणूक नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे.
आजी-माजी चेअरमन रिंगणात
जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई रिंगणात आहेत. नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे.
कुडाळ वगळता सर्व ठिकाणी चुरशीची लढत