पिंपरीत खंडणीसाठी ८ वर्षांच्या निष्पाप बालकाची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या

पोलिसांनी आरोपी बाफिलला केली अटक
पिंपरीत खंडणीसाठी ८ वर्षांच्या निष्पाप बालकाची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या
(प्रातिनिधिक फोटो)

खंडणी मिळण्यासाठी एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली.

पिंपरीत खंडणीसाठी ८ वर्षांच्या निष्पाप बालकाची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या
हिंगोली : भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली हरगुडे वस्ती या ठिकाणी लक्ष्मण बाबू राम देवासी या आठ वर्षाच्या निष्पाप बालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याला घेऊन लक्ष्मण याचे वडील बाबू राम देवासी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हा या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी या परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले तेव्हा त्यांना त्या मध्ये एक व्यक्ती संशयितरित्या याच परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले.

पिंपरीत खंडणीसाठी ८ वर्षांच्या निष्पाप बालकाची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या
अंबाजोगाईमध्ये पुजाऱ्याचा भरदिवसा चाकूने भोसकून खून, धक्कादायक घटनेने खळबळ

पोलिसांनी या फुटेजच्या आधारावर ओळख पटवत 26 वर्षीय बफील अहमद लष्कर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली पण बफिल हा वेळोवेळी आपला जबाब बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी बफिल यास पोलिसी खाक्या दाखविल्या तेव्हा निष्पाप लक्ष्मण देवासी याचा खून आपणच दगडाने ठेचून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली या माहितीच्या आधारेच चिखली पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.

पिंपरीत खंडणीसाठी ८ वर्षांच्या निष्पाप बालकाची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या
अल्पवयीन मुलाने तरुण मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

विदेशात जास्त पगार मिळत असल्याने बफिलला नोकरी करीता तेथे जायचे होते. CNC मशीनचा उत्कृष्ट कारागीर असलेल्या बफिलला आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाख रुपये हवे होते तेव्हा त्याने आपल्या याच परिसरात राहणाऱ्या आणि किराणा व्यावसायिक बाबूराम देवासी यांचा 8 वर्ष वयीन मुलगा लक्ष्मण याचे अपहरण करण्याचा बेत आखला. त्यानंतर त्याला परिचित असलेल्या लक्ष्मण याला आपल्या सोबत घेऊन त्याने तेथून पळ काढला. यानंतर बाफिल आपल्याला आपल्या मर्जीविरूद्ध घेऊन जातो आहे हे लक्षात येताच लक्ष्मणने आरडा-ओरड सुरू केली. तेव्हा बफिलने लक्ष्मण चे तोंड दाबूत त्याला एका पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात मारहाण केली. त्यानंतर आपण केलेले कृत्य लक्ष्मणने कोणालाही सांगू नये याकरिता मोठमोठे दगड घेऊन त्याने ते लक्ष्मणच्या डोक्यावर मारले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला लक्ष्मण मृत झाल्याची खात्री झाल्या नंतरच बफिल ने तेथून पळ काढला. त्यानंतर परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती मृतक लक्ष्मण यांच्या परिवाराला सांगितली तेव्हा या संपूर्ण प्रकाराचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी ची पडताळणी केली. ज्यानंतर हा गुन्हा उघडकीस करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in