महाराष्ट्रात ८ हजार ८९८ नवे Corona रूग्ण, ६० मृत्यूंची नोंद

मुंबई तक

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ९९८ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३९ टक्के इतका आहे. तर आज राज्यात ६ हजार १९५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर राज्यात एकूण २० लाख ४९ हजार ४८४ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत तपासण्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ९९८ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३९ टक्के इतका आहे. तर आज राज्यात ६ हजार १९५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर राज्यात एकूण २० लाख ४९ हजार ४८४ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९६ हजार ३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ८८ हजार १८३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ९१ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ४ हजार १०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात ८५ हजार १४४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Corona टाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात, बीडमधलं लग्न चर्चेत

हे वाचलं का?

    follow whatsapp