बापरे! नऊ वर्षाच्या मुलीला आला हार्टअटॅक; करावी लागली बायपास सर्जरी

मुंबई तक

अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोलापुर जिल्ह्यातील अवनी नकाते या 9 वर्षाच्या मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या कमी वयात तिला हार्ट अटॅक आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करणं, हाच पर्याय उरला होता. तिच्यावर मुंबई […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोलापुर जिल्ह्यातील अवनी नकाते या 9 वर्षाच्या मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या कमी वयात तिला हार्ट अटॅक आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करणं, हाच पर्याय उरला होता. तिच्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं डॉक्टर म्हणाले.

65 वर्षाच्या वृध्दासारखं आहे अवनीचं ह्रदय

काही दिवसांपूर्वी अवनी खेळत असताना तिला छातीत दुखू लागलं. त्यामुळे तिला रुग्णालयात नेलं असता तिला तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या असता तिचा हृदय हा 65 वर्षांच्या वृध्दासारखा कमकुवत आहे. त्यामुळे तिच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे तिच्या पालकांनी तात्काळ मुंबई गाठली. मुंबईतील डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर बायपास सर्जरी केली. सर्जरी नंतर अवनीला नवजीवन मिळाले आहे.

कोलेस्ट्रॉल लेव्हल गेलं होतं 600 च्या पार

हे वाचलं का?

    follow whatsapp