Airtel 5G plus ‘या’ स्मार्टफोनमध्ये आला ऑप्शन; वाचा सविस्तर बातमी
Airtel 5G Plus ची सेवा 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. दिल्ली, वाराणसीसह 8 शहरांतील वापरकर्त्यांना टेलिकॉम ऑपरेटरच्या 5G सेवेचा अनुभव मिळत आहे. तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथेही राहत असाल तर तुम्ही एअरटेलच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. सध्या ग्राहकांना 5G सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तुमच्याकडे फक्त […]
ADVERTISEMENT

Airtel 5G Plus ची सेवा 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. दिल्ली, वाराणसीसह 8 शहरांतील वापरकर्त्यांना टेलिकॉम ऑपरेटरच्या 5G सेवेचा अनुभव मिळत आहे. तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथेही राहत असाल तर तुम्ही एअरटेलच्या सेवेचा लाभ घेऊ शकता.
सध्या ग्राहकांना 5G सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तुमच्याकडे फक्त 5G फोन असणे आणि तुम्ही 5G उपलब्ध असलेल्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे. यानंतरही अनेक वापरकर्ते Airtel 5Gची सेवा मिळवू शकत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना 5G चा पर्याय मिळत नाही. तर युजर्सनी हे स्मार्टफोन फक्त 5G च्या नावाने खरेदी केले. आता या फोनमध्ये 5G सेवा मिळणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5G साठी अपडेट्सची प्रतीक्षा करावी लागेल
या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 5G सेवा मिळणार नाही असे नाही. यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल. स्मार्टफोन निर्माता काही दिवसात सॉफ्टवेअर अपडेट्स जारी करतील. या अपडेटनंतर तुम्ही या स्मार्टफोन्समध्ये 5G नेटवर्क सहज वापरण्यास सक्षम असाल. या क्षणी तुम्हाला कोणत्या स्मार्टफोनमध्ये सेवा मिळेल आणि कोणत्या नाही ते आपण बघू.