अकोला : बंधाऱ्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही मृत्यू

अकोला येथे घडलेल्या घटनेमुळे हळहळ
अकोला : बंधाऱ्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही मृत्यू

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अकोला

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आली. बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा बंधाऱ्यात बुडाल्याची माहिती मिळताच वडिलांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला वाचविण्यासाठी बंधाऱ्यात उडी घेतली; मात्र मुलासोबत वडिलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

उकळी बाजार येथे वाण धरणातील कॅनॉलचे पाणी ओव्हर फ्लो होत असल्याने त्या पाण्यावर बंधारा बांधला आहे. धरणातून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता सध्या पाणी सोडले जात आहे. बंधाऱ्यात पाणी असल्याने परिसरातील शेतकरी याठिकाणी गुरेढोरे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेतात. ६ मार्च रोजी उकळी बाजार येथील कन्हैया गजानन शर्मा हा १५ वर्षीय मुलगा कपडे काढून बैलजोडी धुण्यासाठी गेला असता बंधाऱ्यात बुडाला. ही बाब शेजारी बकऱ्या चारणाऱ्या मुका असलेल्या मुलाला दिसली. त्याने कन्हैयाच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. कन्हैयाचे वडील गजानन मोहनलाल शर्मा (वय ४८ वर्ष) यांनी घटनास्थळ गाठून बंधाऱ्यात उडी घेतली; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काळाने वडील आणि मुलगा दोघांवर झडप घातली. घटनेत दोघांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच गावकरी मंडळी, पोलीस पाटील आणि तलाठी तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले...

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in