सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक : नाराज कार्यकर्त्यांनी लावलेल्या केळ्याच्या फ्लेक्सची बारामतीत चर्चा
– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी आपल्या मनाविरुद्ध काही घडलं तर कोण कशा पद्धतीने नाराजी व्यक्त करेल काही सांगता येत नाही. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी लावलेला केळ्याच्या फलकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या अनोख्या फ्लेक्समुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीतला तो नाराज कोण..? याचा शोध सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी
आपल्या मनाविरुद्ध काही घडलं तर कोण कशा पद्धतीने नाराजी व्यक्त करेल काही सांगता येत नाही. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी लावलेला केळ्याच्या फलकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या अनोख्या फ्लेक्समुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीतला तो नाराज कोण..? याचा शोध सुरु झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या बारामती तालुक्यातल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मेळावा घेत सभासदांना मार्गदर्शन केले होते. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे, नाराजांना फोन करायला मला वेळ नाही. जे निवडणूकीत झटका देतील त्यांना देखील मी झटका देणार आहे, असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार दिला होता.
या निवडणुकीत भाजपच्या वतीने देखील पॅनल उभे करण्यात आले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप या निवडणुकीत सक्रिय झाली आहे. दरम्यान, आज वर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे हे बिनविरोध झाली आहे. त्यामुळे येत्या 12 तारखेला यासाठी निवडणूक होणार आहे.