‘नितीन गडकरींचे बरोबर पाय कापले’; आदित्य ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेनेचे अरविंद सावंत काय बोलले?

मुंबई तक

आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोलणार नाही, असं म्हणणाऱ्या शिंदे गटाने युवा सेना प्रमुखांना लक्ष्य केलं. आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे पप्पू उल्लेख करत शिंदे गटाने मातोश्रीवरही हल्ला चढवला. शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीला शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचे बॅनर आज (२५ ऑगस्ट) शिंदे गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर झळकावले आणि मातोश्रीवर खोके घेतल्याचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोलणार नाही, असं म्हणणाऱ्या शिंदे गटाने युवा सेना प्रमुखांना लक्ष्य केलं. आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे पप्पू उल्लेख करत शिंदे गटाने मातोश्रीवरही हल्ला चढवला. शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीला शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचे बॅनर आज (२५ ऑगस्ट) शिंदे गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर झळकावले आणि मातोश्रीवर खोके घेतल्याचा आरोपही केला. या प्रकारावर अरविंद सावंत यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून उत्तर दिलंय.

अरविंद सावंत म्हणाले, “याचा अर्थ आदित्य ठाकरे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाला ते (शिंदे गट) घाबरत आहेत. त्यांना कळून चुकलंय की, हे महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व आहे. देशाचंही नेतृत्वही कदाचित ते होईल. मग त्यांना बदनाम कसं करायचं, हा केविलवाणा प्रयत्न आहे. एक अतिशय व्हिजनरी तरुण मुलगा, एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं आणि मुंबईचं नेतृत्व करत होता. दावोसमध्ये त्यांची मुलाखत घेण्यासाठी जगभरातील माध्यमे धावली. त्यांना या गल्लीतल्या लोकांनी काहीतरी बोलणं आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा बिघडणार नाहीये. जे कुणी करताहेत, त्यांची प्रतिमा नक्कीच कळेल की, कोण भूंकतंय कुणावर? याने काहीही फरक पडणार नाहीये, उलट ते (आदित्य ठाकरे) अधिक उजाळून निघतील”, असं प्रत्युत्तर अरविंद सावंतांनी शिंदे गटातील आमदारांना दिलं.

‘अधिकाऱ्याला म्हणालो, मंत्रीपद गेलं तरी मला फरक पडत नाही’; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

हे वाचलं का?

    follow whatsapp