आसाम बनलं ऑपरेशन लोटसचं केंद्र?, आधी महाराष्ट्र अन् आता झारखंडवरती भाजपचा डोळा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आसाम हे आजकाल ऑपरेशन लोटसचे (Operation Lotus) केंद्र बनले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार पाडत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर झारखंडमध्येही ऑपरेशन लोटसची स्क्रिप्ट लिहिली जात होती असा आरोप भाजपवरती होत आहे. झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. तेव्हापासून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa sarma) चर्चेत आहेत. कारण एका काँग्रेस आमदाराने आरोप केला आहे की पक्षाचे तीन आमदार गुवाहाटीला जात होते आणि तेथून झारखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यावर चर्चा होणार होती.

काँग्रेसचे आमदार आसामला पोहोचण्यापूर्वीच पकडले नाहीतर…

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंडाचा नारा देणारे शिवसेनेचे आमदार गुजरातमार्गे आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले होते. आसाममधील पंचतारांकित हॉटेलमध्ये दहा दिवसांहून अधिक काळ तळ ठोकत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात आले. हेमंत सोरेन सरकारविरोधात सत्तापालट करून भाजप सरकार स्थापन करण्याची कहाणी झारखंडमध्ये त्याच धर्तीवर लिहिली जाणार होती, पण काँग्रेसचे आमदार आसाममध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले.

झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कोंगारी यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. बंगालमधील रानीहाटी येथे राष्ट्रीय महामार्ग-16 वरून पोलिसांनी तीन आमदारांना एसयूव्ही गाडीमधून ताब्यात घेतले आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे आणखी एक आमदार कुमार जयमंगल सिंग यांनी आरोप केला की, पश्चिम बंगालमध्ये ज्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, त्यांनी जयमंगल यांनाही फोन केला होता आणि त्यांना कोलकाता येथे येण्यास सांगितले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘बंडखोरी करुन जे आमदार येतील, त्या सर्वांना मंत्री बनवणार’

जयमंगल सिंह यांनी आरोप केला की तिन्ही आमदारांनी त्यांना असेही सांगितले की इथून सर्वजण गुवाहाटीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भेटायला जातील. आणि तिथून भाजप सरकार बनवण्याचा विचार केला जाईल. बंडखोरी करत जे आमदार येतील, त्या सर्वांना मंत्री केले जाईल आणि प्रत्येक आमदाराला दहा कोटी रुपयेही मिळतील, असे आश्वासन दिल्याचा आरोप जयमंगल यांनी आपल्या पत्रात केला आहे. झारखंडमधील सध्याचे हेमंत सोरेन सरकार पाडून भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले जाणार असल्याची माहिती आहे.

जयमंगल म्हणाले की, या तिनही आमदारांनी त्यांना सांगितले की आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना दिल्लीतील काही बड्या नेत्यांचा आशीर्वाद मिळाला आहे, त्यामुळे सध्याचे झारखंड सरकार पाडावे लागणार आहे. पुढे जयमंगल सिंह म्हणाले, ”मला भ्रष्टाचाराच्या या दलदलीत अडकायचे नाही. त्यामुळे असा भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही डीसीमार्फत सरकारला माहिती देत ​​आहोत.”

ADVERTISEMENT

आसाम खरोखरच ऑपरेशन लोटसचे नवीन केंद्र बनत आहे?. झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची काय भूमिका होती. झारखंडमधील युतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्रात जे काही केले ते झारखंडमध्ये भाजपला करायचे आहे, असाही आरोप काँग्रेसने केला आहे.

ADVERTISEMENT

‘हा’ दिल्लीतील ‘हम दो’चा गेम प्लॅन

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले होते की, झारखंडमधील भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ पश्चिम बंगालमध्ये उघड झाले आहे. महाराष्ट्रातील एकनाथ-देवेंद्र (ED) जोडीने जे केले ते झारखंडमध्ये करण्याचा दिल्लीतील ‘हम दो’चा गेम प्लॅन आहे. काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले “सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आमदारांच्या थेट संपर्कात आहेत. केंद्रीय मंत्री त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही सत्ताबदलाचे प्रयत्न सुरू आहेत.”

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार पडण्यापूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बंडखोर आमदार हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारच्या आश्रयाखाली गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले होते. ज्या दिवशी महाराष्ट्राचे आमदार गुवाहाटीला पोहोचले त्यादिवशी सरमा स्वतः हॉटेलमध्ये गेले होते, तर राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि पोलीस अधिकारी त्यांच्या मुक्कामादरम्यान हॉटेलमध्ये नियमितपणे दिसले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT