किर्ती मोटे हत्याकांड: ‘आरोपी मुलाला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरु’

मुंबई तक

औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील किर्ती मोटे-थोरे हिच्या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. ऑनर किलिंगची ही घटना एवढी भयंकर होती की, त्यातून पीडित कुटुंबीय अद्यापही सावरु शकलेले नाहीत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लाडगाव येथे जाऊन थोरे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘किर्ती हिची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील किर्ती मोटे-थोरे हिच्या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. ऑनर किलिंगची ही घटना एवढी भयंकर होती की, त्यातून पीडित कुटुंबीय अद्यापही सावरु शकलेले नाहीत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लाडगाव येथे जाऊन थोरे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘किर्ती हिची निर्घृण हत्या करणारा तिचा भाऊ हा अल्पवयीन नसून सज्ञान आहे. पण त्याला अल्पवयीन दाखविण्याची धडपड सुरु आहे.’ असा गंभीर आरोपी चित्रा वाघ यांनी यावेळी केला आहे.

चित्रा वाघ यांनी नेमका काय आरोप केला?

‘प्रेमविवाह करून सुखानं नांदत असलेल्या पोटच्या मुलीची खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावाने मिळून मुंडकं कापून हत्या केली. औरंगाबादच्या वैजापूरमधल्या या घटनास्थळी भेट दिली.’

‘आरोपी मुलगा सज्ञान आहे. परंतु त्याला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरू आहे. यात पोलीस निरीक्षकाची भूमिका संशयास्पद आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp