Viral : पत्नीच्या नाराजीचा पतीला झाला फायदा; एकावेळी लागल्या दोन लॉटरी
ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीला पत्नीच्या नाराजीतून लाखो डॉलर्सचा फायदा झाला आहे. भारतीय चलनात ही किंमत १० कोटींच्या घरात आहे. आपल्या चिडलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी त्या व्यक्तीने समान क्रमांक टाकून दोन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. यानंतर, दोन्ही तिकिटांवर पतीला जॅकपॉट लागला. या दोन्ही तिकिटांवर मिळून 2 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, 10 कोटी 76 लाख […]
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीला पत्नीच्या नाराजीतून लाखो डॉलर्सचा फायदा झाला आहे. भारतीय चलनात ही किंमत १० कोटींच्या घरात आहे. आपल्या चिडलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी त्या व्यक्तीने समान क्रमांक टाकून दोन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. यानंतर, दोन्ही तिकिटांवर पतीला जॅकपॉट लागला. या दोन्ही तिकिटांवर मिळून 2 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, 10 कोटी 76 लाख 15 हजार) मिळाले आहेत. (Australian man wins two million in lottery because of her angry wife)
नेमकं काय घडलं?
खरंतरं, पतीने एक आठवड्यापूर्वी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. या तिकिटांवर पत्नीने नमूद केलेला नंबर न टाकता पतीने आपल्या मनात नंबर टाकला, त्यामुळे पत्नी चांगलीच संतापली. आपल्या चिडलेल्या बायकोला शांत करण्यासाठी नवऱ्याने पुढच्या आठवड्यात दोन लॉटरीची तिकिटे घेतली आणि दोन्हीवर एकच नंबर टाकला आणि ड्रॉसाठी जमा केला.
News.com.au च्या बातमीनुसार, लॉटरी जिंकल्यानंतर पती म्हणाला, ‘आम्ही २ तिकिटांवर एकच नंबर का टाकला याची गोष्ट खूप मजेशीर आहे. मागच्या आठवड्यात मी तिकिटावर बायकोचा नंबर टाकायला विसरलो. या गोष्टीमुळे ती माझ्यावर रागावली होती. त्यामुळे या आठवड्यात मी तिचा नंबर दोनदा ड्रॉमध्ये टाकायचा विचार केला.”