बीड: मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू
बीड: अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडलगत कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी (4 फेब्रुवारी) दुपारी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय 16 वर्ष) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18 वर्ष) अशी त्या बहिणींची नावे आहेत. अतिशय गरीब कुटुंबातील निदा आणि […]
ADVERTISEMENT

बीड: अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडलगत कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी (4 फेब्रुवारी) दुपारी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय 16 वर्ष) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18 वर्ष) अशी त्या बहिणींची नावे आहेत.
अतिशय गरीब कुटुंबातील निदा आणि सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहतात. अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी धुणीभांडी करते.
शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडी येथे सोडले होते. स्वाराती रुग्णालयाला जाणाऱ्या रोडलगत कंपनी बागेच्या विहिरीबाहेर शेळ्या चारत असलेल्या एका व्यक्तीला दोन मुलीचे मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली.
याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले आहेत. मात्र ही घटना नेमकी कशी घडली हे शवविच्छेदन अहवालनंतर समजणार आहे.