Chinchwad by-election : अश्विनी जगतापांनी चिंचवड जिंकलं; कलाटेंमुळे ‘मविआ’चा गेम?

मुंबई तक

Chinchwad Assembly by-election : चिंचवड : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभा मतदासंघ पोटनिवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळविला आहे. तब्बल ३६ हजार १६८ मतांनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव केला. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) ४४ हजार ११२ मतांसह तिसऱ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Chinchwad Assembly by-election :

चिंचवड : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभा मतदासंघ पोटनिवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळविला आहे. तब्बल ३६ हजार १६८ मतांनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव केला. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) ४४ हजार ११२ मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं होतं. (BJP candidate Ashwini Jagtap won in Chinchwad Assembly by-election)

चिंचवडमधील थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यात पोस्टल फेरीपासूनच जगताप यांनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतदानात जगताप यांना ४०५३ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ३६०४ पोस्टल मतं आणि अपक्ष राहुल कलाटेंना १२७३ मतं मिळाली. त्यानंतर प्रत्येक फेरीत जगताप यांनी आघाडी कायम राखली.

Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत

हे वाचलं का?

    follow whatsapp