विधानसभा: ‘तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, नितेश राणेंच्या वक्तव्यावर भास्कर जाधव प्रचंड संतापले!
मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून म्यॉव म्यॉव आवाज काढून टिंगल केली होती. ज्यामुळे आज (27 डिसेंबर) शिवसेनेचे आमदार आणि नेते सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. यावेळी भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत नितेश राणेंना निलंबित करण्याची माणगी केली. एवढंच नव्हे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून म्यॉव म्यॉव आवाज काढून टिंगल केली होती. ज्यामुळे आज (27 डिसेंबर) शिवसेनेचे आमदार आणि नेते सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. यावेळी भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत नितेश राणेंना निलंबित करण्याची माणगी केली. एवढंच नव्हे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर देखील यावेळी टीका केली.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची टिंगल करुन शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचं यावेळी अनेक आमदारांनी म्हटलं. त्याचवेळी मागील अधिवेशनात अभिरुप विधानसभेत बोलताना नितेश राणेंनी जे भाषण केलं होतं त्यावर आक्षेप घेत भास्कर जाधवांनी भाजपवर तुफान टीका केली.
पाहा भास्कर जाधव सभागृहात नेमकं काय म्हणाले:
‘विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपचे आमदार निषेध करत होते. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जात असताना त्यांच्या एका सदस्याने आवाज काढला होता. सुनील प्रभूंनी त्याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. मी तेव्हा सभागृहात नव्हतो. पण ती सगळी क्लिप मी नंतर पाहिली.’