साप चावलेल्या तरुणाचे प्राण 'या' आमदारामुळे वाचले!

BJP MLA Sachin Kalyanshetti: सोलापूर-अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे एका सर्पदंश झालेल्या तरुणाचे प्राण वाचले आहेत.
साप चावलेल्या तरुणाचे प्राण 'या' आमदारामुळे वाचले!
BJP mla sachin kalyanshetti presence of mind saved life young man who was bitten by a snake(प्रातिनिधिक फोटो)

विजयकुमार बाबर, सोलापूर

एखाद्या व्यक्तीस सर्पदंश झाल्यास त्याला तात्काळ उपचारांची गरज असते. अनेकदा वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने बऱ्याच जणांना प्राण गमावल्याच्या घटना देखील आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, सोलापूरमध्ये एका आमदाराने समयसूचकता दाखवत सर्पदंश झालेल्या एका तरुणाला योग्य मदत केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे सोलापूरमधील त्या आमदाराचे बरंच कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूर-अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे करजगी तालुका अक्कलकोट येथे आपल्या एका नियोजित कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी वाटेत एका व्यक्तीस सर्पदंश झाल्याचे त्यांना दिसून आले. तसेच त्या व्यक्तीला तात्काळ उपचाराची गरज असल्याचेही त्यांना समजले.

यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी फार विचार न करता आपली स्वतःची चारचाकी गाडी देऊन त्या तरुणाला उपचारासाठी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात पाठवून दिले. याचवेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमास उशीर होऊ नये म्हणून थेट एका टमटमने प्रवास केला आणि कार्यक्रम स्थळ गाठलं.

आमदार कल्याणशेट्टी यांचा टमटममधून प्रवास
आमदार कल्याणशेट्टी यांचा टमटममधून प्रवास

अक्कलकोट तालुक्यातील करजगी व तडवळ या भागातील नियोजित कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी जात असताना कल्याणनगर ते करजगी दरम्यान, रस्त्यावर काही लोक थांबले असल्याचे त्यांना आढळून आले.

नेमकी गर्दी का झाली याबाबत त्यांनी तात्काळ चौकशी केली असता त्यांना समजलं की, पान-मंगरूळ येथील अमीन अहमदहनीफ मंद्रूप या तरुणाला सर्पदंश झाला होता. यावेळी त्याला उपचारांसाठी मोटरसायकलवरून दवाखान्यात नेले जात होते पण वाटेतच पेट्रोल संपल्याने ते लोकं दुसऱ्या वाहनाची वाट पाहत होते.

दरम्यान, नेमकी परिस्थिती लक्षात येताच तात्काळ आमदार कल्याणशेट्टी यांनी आपली चारचाकी गाडी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस दवाखान्यात नेण्यासाठी दिली व स्वतः दुसऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या टमटमला थांबवून ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या चारचाकी मधून सर्पदंश झालेले अमीन अहमदहनीफ मंद्रूप याला प्रथम अक्कलकोट येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र, त्याची प्रकृती खालावत चालल्याने त्याला सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरीकडे आमदार कल्याणशेट्टी यांचे वाहन चालक असिफ बेग आणि सुरक्षा रक्षक हे सर्पदंश झालेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिरावत नाही तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच थांबले. दरम्यान, काही वेळाने तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे समजल्यानंतरच त्यांनी दवाखाना सोडला.

BJP mla sachin kalyanshetti presence of mind saved  life young man who was bitten by a snake
वर्धा : सापाच्या विषाशी संघर्ष करणाऱ्या 'त्या' परीचा जीवनाशी संघर्ष सुरुच

दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने एका तरुणाचे प्राण वाचले याबाबत त्यांचं बरंच कौतुक होत असून सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in