राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचं डी-गँगशी जोडलं गेलं होतं नाव, जाणून घ्या...

मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात झालेल्या शूटआऊटशी जोडलं गेलं होतं ब्रिजभूषण सिंग यांचं नाव
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचं डी-गँगशी जोडलं गेलं होतं नाव, जाणून घ्या...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरल्यानंतर 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे. एकीकडे राज्यात मनसे-भाजप युतीच्या चर्चा होत असताना दुसरीकडे भाजप खासदाराकडून राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी हात जोडून माफी मागा नाहीतर अयोध्येत घुसू देणार नाही अशा शब्दांत राज ठाकरेंना सुनावलं आहे.

उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील खासदार असलेले ब्रिजभूषण सिंग हे स्थानिक राजकारणातले बाहुबली मानले जातात. 1991 साली भाजपच्या तिकीटावरुन गोंदा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या ब्रिजभूषण सिंग यांनी दोन वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. यानंतर 2004 साली त्यांनी बलरामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर 2009 साली त्यांनी समाजवादी पक्षाची साथ दिली. ज्यानंतर काही वर्षांनी ते पुन्हा याच मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले.

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचं डी-गँगशी जोडलं गेलं होतं नाव, जाणून घ्या...
हात जोडून माफी मागा नाहीतर अयोध्येत घुसू देणार नाही - भाजप खासदाराने राज ठाकरेंना सुनावलं

राजकारणासोबतच भारतीय कुस्ती महासंघावरही ब्रिजभूषण सिंग यांची एकहाती सत्ता आहे. गेली अनेक वर्ष कुस्ती महासंघाच्या माध्यमातून ब्रिजभूषण सिंग क्रीडा जगतात राजकारण करत आहेत. राज ठाकरेंना इशारा दिल्यानंतर चर्चेत आलेल्या ब्रिजभूषण सिंग यांचं दाऊद गँगशी कनेक्शन काही वर्षांपूर्वी समोर आलं होतं. 1992 साली मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात झालेल्या शूटआऊटमध्ये कल्पनाथ राय आणि ब्रिजभूषण सिंग यांना सहआरोपी केलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या माणसांनी डी-गँगचा प्रमुख दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरच्या नवऱ्याची हत्या केली. दाऊने आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या हत्येचा बदला घेण्याची जबाबदारी सुभाष ठाकूर आणि ब्रिजेश सिंग यांच्याकडे सोपवली होती. या दोन्ही मारेकऱ्यांना आश्रय आणि मदत केल्याचा आरोप कल्पनाथ राय आणि ब्रिजभूषण सिंग यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतू दोन्ही आरोपींनी नंतर स्वतःला न्यायालयाच्या स्वाधीन केलं होतं. ज्यानंतर दोघांचीही या प्रकरणातून सबळ पुराव्याच्या अभावी सुटका झाली होती.

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांचं डी-गँगशी जोडलं गेलं होतं नाव, जाणून घ्या...
Brijbhushan Sharan Singh : राज ठाकरेंना ललकारणारे ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

याव्यतिरीक्त सीबीआयने दिलेल्या माहितीप्रमाणे, बाबरी मशिदचा घुमट पाडण्याचा आरोप असलेल्या कारसेवकांमध्येही ब्रिजभूषण यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.