मुख्यमंत्र्यांनी राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – चंद्रकांत पाटील

मुंबई तक

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांप्रकरणी NIA ने सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली. रविवारी कोर्टाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA च्या कस्टडीत दिलं आहे. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांप्रकरणी NIA ने सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली. रविवारी कोर्टाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA च्या कस्टडीत दिलं आहे. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. NIA ने दहशतवादी कटात अटक केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला मुख्यमंत्री कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही लाजीरवाणी बाब आहे. अशा कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे असं त्यांना वाटत नाही का?? असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसुख हिरेन प्रकरणात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन वाझे यांचे समर्थन का केलं जात होतं असा सवाल विचारला आहे.

दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकारला टोला लगावला आहे. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी आता तर नुसती सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा एक भाग समोर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे असं सांगितलं. दुर्दैवाने राज्य सरकारच्या वतीने आतापर्यंत वाझे यांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं. ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे प्रश्न विचारुन त्यांची वकिली करण्याचं काम सरकारने केलं. पण NIA ने तपास हाती घेतल्यानंतर आता त्यांना यामध्ये महत्वाचे पुरावे मिळत आहेत. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणीही काही महत्वाचे धागेदोरे आणि पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सचिन वाझेंपुरतं मर्यादीत नाही. त्यांना कोणी पाठींबा दिला, यामागे कोण आहे हे देखील आगामी काळात पुढे येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp