किरीट सोमय्यांना दणका, हसन मुश्रीफांना दिलासा! उच्च न्यायालयात काय घडलं?
kirit Somaiya Vs Hasan Mushrif : भाजप नेते किरीट सोमय्यांना हसन मुश्रीफ प्रकरणात मोठा झटका बसलाय. तर दुसऱ्यांदा ईडी धाडींचा सामना करणाऱ्या मुश्रीफांना दिलासा मिळालाय. हायकोर्टानं मुश्रीफांना संरक्षण दिलंय, तर सोमय्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची इत्यंभूत अधिकृत माहिती देणारे सोमय्याचं अडचणीत आलेत. नेमकं प्रकरण काय, हायकोर्टानं मुश्रिफांना कोणता […]
ADVERTISEMENT

kirit Somaiya Vs Hasan Mushrif : भाजप नेते किरीट सोमय्यांना हसन मुश्रीफ प्रकरणात मोठा झटका बसलाय. तर दुसऱ्यांदा ईडी धाडींचा सामना करणाऱ्या मुश्रीफांना दिलासा मिळालाय. हायकोर्टानं मुश्रीफांना संरक्षण दिलंय, तर सोमय्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची इत्यंभूत अधिकृत माहिती देणारे सोमय्याचं अडचणीत आलेत. नेमकं प्रकरण काय, हायकोर्टानं मुश्रिफांना कोणता दिलासा दिलाय आणि सोमय्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.(Bombay High Court orders probe on how BJP’s Kirit Somaiya procured judicial order)
हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या : नेमकं प्रकरण काय?
संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीतून हसन मुश्रीफांना कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या करत आहेत. या प्रकरणात मुश्रीफांना जेलमध्ये जावं लागेल, असं सोमय्या छातीठोपणे सांगतात. ईडीच्या तपासाची इत्यंभूत अधिकृत माहितीही देतात. पण आता सोमय्या याच गोष्टीमुळे अडचणीत आलेत. मुश्रीफांनी शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत विवेक कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार केली. याच तक्रारीला मुश्रीफांनी हायकोर्टात आव्हान दिली. यावरच न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या पीठापुढे सुनावणी झाली.
हसन मुश्रीफ उच्च न्यायालयात काय म्हणाले?
मुश्रीफ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. किरीट सोमय्या यांनी माझी राजकीय कारकीर्द उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने मला अनेक दिवसांपासून टार्गेट केलंय. माझ्यावर आणि कुटुंबियांवर निराधार, खोटे आरोप करत इन्कम टॅक्स आणि ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. सोमय्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतरच कंपनी नोंदणी कार्यालयातील सहाय्यक निबंधकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर तशीच एक तक्रार करण्यात आली. त्यावरून पुण्यातील विशेष न्यायालयाने कारखाना आणि अन्य काहींविरोधात प्रोसेस म्हणजेच कायदेशीर कार्यवाही प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. याविरोधात कारखान्याने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टानं २ मे २०२२ ला या प्रोसेसला स्थगिती दिली.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचा छापा