क्रांती रेडकरच्या एका ट्विटला नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींकडून करारा जवाब! म्हणाल्या...

जाणून घ्या काय म्हटलं आहे नीलोफर आणि सना या दोघींनी..
क्रांती रेडकरच्या एका ट्विटला नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींकडून करारा जवाब! म्हणाल्या...

अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या चर्चेतला चेहरा आहे. याचं कारण आहे समीर वानखेडे. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारून कारवाई केली आणि आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या दीड महिन्यापासून गाजतंय. कारण नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी समीर वानखेडेंवर ही सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर त्यांनी जवळपास रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप केले आहेत.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांनी SC असल्याचा खोटा दाखला देऊन सरकारी नोकरी मिळवली. त्यांनी पहिल्या पत्नीला तलाक दिला आणि तिने याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिच्या भावाला ड्रग्ज केसमध्ये अडकवलं. समीर वानखेडे यांचे वडील हे दाऊद वानखेडे असं नाव लावत होते. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न निकाह पद्धतीने झालं होतं. हे आणि असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. ज्या आरोपांना समीर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्याकडून वारंवार उत्तर देण्यात आलं आहे. आता क्रांती रेडकरने एक ट्विट केलं आहे. ज्या ट्विटला नवाब मलिक यांच्या दोन्ही मुलींनी करारा जवाब दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक...nawab malik/twitter

काय आहे क्रांती रेडकरचं ट्विट?

'वाह, क्या खौफ है.. सोते जागते, उठते बैठते नवाब चाचा सिर्फ समीर वानखेडे के बारेमें सोचते हैं. सुबह नहीं हुई की ट्विट शुरू. डर पैदा करो तो ऐसा. Power of honest officer' असं ट्विट क्रांती रेडकरने 19 तारखेला केलं आहे. या ट्विटला #Farziwada असं म्हणत निलोफर सना मलिक या दोघींनीही उत्तरं दिली आहेत.

काय म्हटलं आहे नीलोफरने?

खौफ उन्हे होता है जिन्होने छल कपट किया हो. पर्दाफाश होने डरसे तिलमिलाना बंद किजीये. कोई फायदा नहीं होगा.

काय म्हटलं आहे सना मलिकने?

खौफ? किसे? किसीको ये खौफ है की खुदा देख ना ले..

किसी को ये आरजू की खुदा देखता रहे..

असं म्हणत या दोघींनीही क्रांती रेडकरला उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे.twitter

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या विविध आरोपांमुळे त्यांच्याकडून आर्यन खान, समीर खान प्रकरण यासारखी सहा प्रकरणं काढून घेण्यात आली आहेत. अशात क्रांती रेडकरने नवाब मलिकांच्या ट्विटर पोस्ट्स विरोधात राज्यपालांचीही भेट घेतली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी ज्ञानदेव वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी रामदास आठवलेंचीही भेट घेतली. नवाब मलिकांनी जे आरोप केले आहेत त्याविरोधात ज्ञानदेव वानखेडे कोर्टातही गेले आहेत त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटीच्या बदनामीचा दावा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in